---Advertisement---

रॉबिन उथप्पाचा T10मध्ये धुमाकूळ, 88 धावा ठोकत संघाला मिळवून दिला विजय

Robin Uthappa
---Advertisement---

हरारे या ठिकाणी झिम आफ्रो टी10 लीग चालू आहे. यात भारतीय क्रिकेट संघाचे अनेक माजी खेळाडू खेळताना दिसत आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्वी फेरीत हरारे हॅरिकेन्स विरुद्ध कॅपटाऊन सॅम्प आर्मी यांच्यात सामना चालू होता. यात हरारे हॅरकेन्सने कॅपटाऊन सॅम्प आर्मीला 9 विकेट्स राखून पराभूत केले. कॅपटाऊनने पहिली फलंदाजी करत 10 षटकांत 145 धावा केल्या. प्रत्युत्तरात हॅरिकेन्सने हे लक्ष 9.2 षतकांत गाठले आणि सामना नावावर केला. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने आपल्या हॅरिकेन्स संघासाठी तुफानी फलंदाजी केली.

रॉबिन उथप्पा () हरारे हॅरिकेन्स या संघाचा कर्णधार आहे. उथप्पाने आक्रमक फलंदाजी करत 36 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 88* धावांची खेळी केली. सोबतच डोनावोन फरेरा याने 16 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने 35 धावा केल्या. तर इव्हिन लुईसने 6 चेंडूत 12 धावा केल्या.

तत्पूर्वी कॅपटाऊन सॅम्स आर्मीने प्रथम फलंदाजी केली. कॅपटाऊनसाठी रहमनुल्लाह गुरबाज याने 6 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 62 धावांचा सर्वोत्तम खेळी केली. तसेच भानुका राजपक्षने याने 11 चेंडूत 25 धावांची खेळी केली. करिम जनात याने 10 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकैर लावत 24 धावा केल्या. फलंदाजांच्या या महत्वपूर्ण योगानामुळे प्रथम फलंदाजी करताना कॅपटाऊने 145 धवांचा टप्पा  गाटला.

रॉबिन उथप्पाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
उथप्पाने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 सामने खेळले आहेत. यात त्याने 6 अर्धशतके करत 934 धावा केल्या आहेत. बरोबरच त्याच्या टी20 कारकिर्दीत 13 सामने खेळून 1 अर्धशतकासह 249 धावा केल्या आहेत. उथप्पाने भारतासाठी जरी कमी सामने खेळले असले तरी त्याने आयपीयलमध्ये आपले नाव गाजवले आहे. आपीयलमध्ये तो आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जात होता. त्याने आयपीयलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यात त्याच्या 4952 धावा आसून 27 अर्धशतके केली आहेत.

महत्वाच्या बातम्या:  
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’
SRHची मालकीण काव्या मारनला दु:खात पाहू शकत नाहीत रजनीकांत; म्हणाले, ‘हैदराबादने आता…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---