---Advertisement---

…म्हणून कर्णधार रोहितने भुवनेश्वरला दिली नाही शेवटची ओव्हर, जाणून घ्या खरे कारण

---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोमवारी (१ ऑगस्ट) खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने चांगले प्रदर्शन केले होते, पण दुसऱ्या सामन्यात संघ अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. वेस्ट इंडीजने सोमवारी खेळलेला हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. भारतासाठी फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. मात्र, शेवटच्या षटकात आवेश खान धावांवर लगाम लावू शकला नाही. पराभवानंतर रोहित शर्माने शेवटच्या षटकात आवेशला संधी देण्याचे कारण स्पष्ट केले. 

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याची २ षटके शिल्लक असताना देखील रोहित शर्माने त्याला गोलंदाजी न देता आवेश खानच्या हातात चेंडू दिला. वेस्ट इंडीजला शेवटच्या षटकात विजयासाठी १० दावांची आवश्यकता होती, ज्या त्यांनी आवेशच्या पहिल्या दोन चेंडूंमध्येच मिळवल्या. अनेकांच्या मते आवेश खान ऐवजी भुवनेश्वर कुमारने शेवटचे षटक टाकले असते, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकत होता. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील या मताशी सहमत आहे. पण त्याला असेही वाटते की, युवा खेळाडूंना देखील अशा दबावाच्या परिस्थितीत आजमावले गेले पाहिजे.

पराभवानंतर रोहितने याविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, “आम्हाला माहीत आहे भुवनेश्वर कुमार संघासाठी अशी कामगिरी करू शकतो. तो अनेक वर्षांपासून असे करत आला आहे. पण तुम्ही जोपर्यंत आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना संधी देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणारही नाही.”

रोहितच्या मते वेस्ट इंडीज संघासाठी हे लक्ष्य सोपे होते, पण त्यांना दे सहजासहजी गाठता आले नाही. “असे लक्ष्य १३-१४ षटकांमध्ये गाठले जाऊ शकते, पण आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला. मला वाटते गोलंदाजांनी ठरल्याप्रमाणे प्रदर्शन केले. त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे मी खूप खुश आहे. आम्हाला फलंदाजीतल काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. मी असे म्हणेल की, आम्हाला फलंदाजीतही असेच प्रदर्शन हवे आहे. आम्ही घाबरणार नाही, एका पराभवाने काहीच बदलणार नाहीये,” असे रोहित पुढे बोलताना म्हणाला.

शेवटच्या षटकात आवेश खान (Avesh Khan) गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने सुरुवातील दोन नो बॉल टाकले आणि फलंदाजांना फुकटच्या दोन धावा मिळाल्या. त्यानंतर पुढच्या चेंडूवर फलंदाजाने षटकार आणि त्यानंतर एका चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि मर्यादित २० षटकांमध्ये १३८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तारत वेस्ट इंडीजने १३९ धावांचे हे  लक्ष्य १९.३ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

दुसऱ्या टी२० नंतर आता तिसऱ्या सामन्यालाही उशीर, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार मॅच?

पचवायला थोडं जड जाईल अशा विक्रमाच्या यादीत ‘शर्माजी का लडका’

ओबेड मॅकॉयने लगावला विकेट्सचा ‘षटकार’, बनलाय भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---