पोर्ट ऑफ स्पेन।वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याने या सामन्यात 99 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार मारले. हे विराटचे वनडे क्रिकेटमधील 43 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 68 वे शतक आहे. या शतकाबरोबरच विराटने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकात 7 बाद 240 धावा केल्या होत्या. तसेच भारताला डकवर्थ लूईस नियमानुसार 35 षटकात 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
या आव्हानाचा पाठलाग भारताने 32.3 षटकात पूर्ण केला. या आव्हानाचा पाठलाग करताना विराटला श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 65 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
या सामन्यात विराटने केले हे काही खास विक्रम –
#कोणत्याही सलग 10 वर्षांत(एका दशकात) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा विराट कोहली हा जगातील पहिलाच फलंदाज आहे.
2️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs for Virat Kohli in the 2010s, and he isn't done yet 💪
No batsman has ever scored as many in a single decade 😮
What a phenomenal cricketer 🙌#WIvIND pic.twitter.com/glRYNR7whk
— ICC (@ICC) August 14, 2019
#एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणारे फलंदाज-
9- विराट कोहली, वेस्ट इंडिज (35 डाव)
9- सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलिया (70डाव)
8- सचिन तेंडुलकर, श्रीलंका (80 डाव)
8- विराट कोहली,ऑस्ट्रेलिया (35 डाव)
8- विराट कोहली, श्रीलंका (46 डाव)
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 10,000 धावा पूर्ण करणारा विराट 6 वा क्रिकेटपटू.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –
15440 – रिकी पॉटिंग (376 डाव)
14878 – ग्रॅमी स्मिथ (368 डाव)
11561 – स्टिफन फ्लेमिंग (348 डाव)
11207 – एमएस धोनी (330 डाव)
11062 – ऍलेन बॉर्डर (319 डाव)
10027 – विराट कोहली (176 डाव)
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 10000 धावा करणारे क्रिकेटपटू –
176 डाव – विराट कोहली
225 डाव – रिकी पॉटिंग
#विराट कोहली वेस्ट इंडिजमध्ये सलग तीन वनडेमध्ये शतके करणारा पहिला खेळाडू आहे. तसेच या देशात वनडेत 4 शतके करणारा पहिला पाहुणा खेळाडू आहे.
#विजयी सामन्यात सर्वाधिक शतके करणार फलंदाज (वनडे, कसोटी व टी20 मिळून) –
55 शतके – रिकी पाॅटींग, विजयी सामने- 377
53 – सचिन तेंडूलकर, विजयी सामने- 307
46 – विराट कोहली, विजयी सामने- 227
#कर्णधार असताना वनडेत एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
7 शतके – विराट कोहली, विंडीज
5 शतके – रिकी पाॅटींग, न्यूझीलंड
#कर्णधार असताना वनडेत सर्वाधिक शतके –
22 शतके – रिकी पॉटिंग
21 शतके – विराट कोहली
13 शतके – एबी डिविलियर्स
11 शतके – सौरव गांगुली
10 शतके – सनथ जयसुर्या
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धावांचा रतीब घालणारा स्मिथ मैदानाबाहेर या कारणामुळे झाला करोडपती
–२६ धावा करताच या खास यादीत रोहित शर्मा टाकणार युवराज सिंगला मागे