वेस्ट इंडीज दौऱ्यातील पहिल्य सामन्यात शिखर धवन आणि शुबमन गिल या सामनावीर जोडीने केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. वेस्ट इंडीजने हा सामना ३ धावांच्या अंतराने जिंकला. या सामन्यात कर्णधार शिखर धवनने ९९ चेंडूत सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. धवनने फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षण करताना देखील चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडीजने या सामन्यात नामेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी पहिल्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने (54) देखील अर्धशतक ठोकले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर ३०८ धावा केल्या.
त्यानंतर भारतीय संघ जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा धवनच्या एका कृतीने मैदानातील सर्वांचे लक्ष वेधले. समालोचक आणि सामना लाईव्ह पाहणाऱ्यांनाही धवनचे आश्चर्य वाटले. हा प्रसंग वेस्ट इंडीजच्या डावातील ३७ व्या षटकात घडला. युझवेंद्र चहल त्यावेळी गोलंदाजी करत असून स्ट्राईकवर असलेल्या ब्रँडन किंगने कवर्सच्या दिशेने एक जोरदार शॉट खेळला.
त्याठिकाणी श्रेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या धवनने मात्र हा चेंडू सहज पकडला. चेंडू पकडल्यानंतर धवनने तो तत्काळ गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाकडे टाकणे अपेक्षित होते. परंतु त्याने तसे न करता, जागेवर पुशअप्स मारू लागला. त्याचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. समालोचकही धवनच्या या कृतीमुळे हसू लागले होते. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
No one can take the cameras off this man @SDhawan25! When he's not batting, he's still entertaining!
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode 👉https://t.co/RCdQk12YsM@windiescricket @BCCI#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvWI pic.twitter.com/5zbTVvZXZz
— FanCode (@FanCode) July 22, 2022
शुबमन गिलने या सामन्यात अर्धशतक ठोकले. डिसेंबर २०२० नंतर त्याच्या पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या गिलने या सामन्यात ५२ चेंडूत ६४ धावा केल्या. धवनने या सामन्यात ९९ चेंडू खेळले आणि ९७ धावा केल्या. वेस्ट इंडीजसाठी कायल मार्यर्सने ६८ चेंडूत ७५ धावा केल्या. तसेच शमर ब्रुक्स ६१ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती, पण तीन धावा कमी पडल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
WIvsIND: संजू सॅमसनच्या ‘त्या’ अप्रतिम डाईव्हने पराभवापासून बचावला भारत, व्हिडिओ व्हायरल
ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन
सचिनवर भारी पडला युवा शुबमन गिल, वेस्ट इंडीजमध्ये करून दाखवला ‘हा’ पराक्रम