---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टिम इंडियाची घोषणा, विराटसह ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर

---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आज (१४ जुलै) भारतीय टी२० संघ जाहीर केला आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत पाच सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना  २९ जुलैला खेळला जाणार आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना २९ जुलैला खेळला जाणार आहे. तसेच शेवटचा सामना ७ ऑगस्टला खेळला जाणार आहे. १८ जणांच्या या संघात केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तरीही त्यांच्या फिटनेसबाबत अनिश्चितता आहे. तसेच अनुभवी फिरकीपटू आर अश्विनही संघात परतला आहे. आगामी विश्वचषकामुळे सर्वच संघ टी२० मालिका अधिक खेळण्यावर भर देत आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

याआधी भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला होता. त्यामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ENGvsIND: इंग्लंडला हरवणे सोपे नाही, वनडेतील कामगिरी पाहुन तुम्हीही असेच म्हणाल

आर अश्विनने क्रिकेटच्या ‘या’ नियमांमध्ये सुचविला बदल; स्विच हीट, रिवर्स स्वीपवरही केले धक्कादायक विधान

Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---