भारताने चौथ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा (WIvsIND) ५९ धावांनी पराभव केला आहे. हा सामना फ्लोरिडा येथे खेळला गेला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांचा टी२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मागील काही सामन्यांपासून भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघासाठी सामनाविजयाची भुमिका बजावली आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यातही सर्वाधिक धावा करत एक पराक्रम आपल्या नावे केला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) हा भारतासाठी अनेक सामन्यांत संकटमोचक ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत ४४ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ चौकारांचा समावेश आहे. याामुळे त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजयी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून भारतासाठी सर्वाधिकवेळा सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
पंतने वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर सूर्यकुमार यादव हे दोघे बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने तिसऱ्या विकेटसाटी दीपक हुड्डाच्या साथीने ४७ धावांची भागीदारी रचली. नंतर त्याने चौथ्या विकेटसाठी संजू सॅमसनबरोबर २२ चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली.
पंतने २०१७मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने बंगळुरू येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यात नाबाद ५ धावा केल्या होत्या. अनेकदा त्याने भारतासाठी उत्तमोत्तम खेळी करत संघाला विजय मिळवून दिले आहे. तो मर्यादित षटकाच्या सामन्यात धावा काढण्यात अपयशी ठरत आहे, अशा टीका त्याच्यावर होत होत्या. आता त्याने ही महत्वपूर्ण खेळी करत टीकाकरांचे तोंड बंद केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२०च्या ४८ डावांमध्ये ८८३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजयी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून भारतासाठी सर्वोच्च धावा करणारे
३ वेळा रिषभ पंत*
२ वेळा केएल राहुल
१ वेळा इशान किशन
१ वेळा रॉबिन उथप्पा
१ वेळा दिनेश कार्तिक
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कर्णधाराने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना दिलं विशेष गिफ्ट, पाहा व्हिडिओ
भारतीय खेळाडूचा झेल सोडल्याने वाद घालणं आलं अंगलट, इंग्लंडच्या खेळाडूला आयसीसीकडून शिक्षा
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर