---Advertisement---

हे फक्त आयपीएलमध्येच होऊ शकतं!! एकाच चेंडूवर २ रनआऊट आणि ४ धावा, पाहा लास्ट बॉलचा सावळा गोंधळ

On: मंगळवार, मे 24, 2022 11:20 PM
Last-Ball-Drama
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग या टी२० लीगमध्ये आजवर बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी घडताना दिसल्या आहेत. असेच काहीसे मंगळवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पाहायला मिळाले. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील राजस्थानच्या डावातील शेवटच्या षटकात नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर राजस्थानचे २ फलंदाज धावबाद झाले. तसेच त्यांच्या खात्यात ४ धावाही जमा झाल्या. 

त्याचे झाले असे की, गुजरातकडून यश दयाल (Yash Dayal) डावातील विसावे षटक टाकण्यासाठी (Last Over) आला होता. या षटकातील पहिल्या ५ चेंडूंवर राजस्थानच्या जोस बटलर (Jos Buttler) आणि रियान पराग (Riyan Parag) यांनी मिळून ११ धावा काढल्या. परंतु शेवटच्या चेंडूवर सावळा गोंधळ पाहायला मिळाला.

बटलरने हा चेंडू लॉन्ग ऑनला मारला आणि १ धाव पूर्ण केली. परंतु स्ट्राईक तो अजून एक धाव काढण्यासाठी पळाला. इतक्यात लॉन्ग ऑवरील क्षेत्ररक्षक अल्झारी जोसेफने चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे फेकला. साहाने त्वरित चेंडू पकडून बटलरने दुसरी धाव पूर्ण करण्याआधी यष्ट्या उडवल्या. अशाप्रकारे बटलर ८८ धावांवर धावबाद (Jos Buttler Runout) झाला. परंतु दयालचा हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळे १ अतिरिक्त धाव राजस्थानच्या खात्यात नोंदवली गेली आणि दयालला पुन्हा हा चेंडू टाकावा लागला.

दयालने पुन्हा हा चेंडू टाकला. यावेळी आर अश्विन स्ट्राईकवर होता. अश्विनने हा चेंडू हिट केला. परंतु तो धाव घेण्यासाठी पळालाच नाही. मात्र नॉन स्ट्राईकवरील रियान पराग वेगाने धावत स्ट्राईकपर्यंत पोहोचला. परिणामी साहाने पटकन चेंडू दयालकडे फेकला आणि परागला धावबाद (Riyan Parag Runout) केले. मात्र हा चेंडू वाईड निघाला. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थानला एक अतिरिक्त धाव मिळाली आणि पुन्हा चेंडू फेकावा लागला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर तिसऱ्या वेळी दयालने चेंडू व्यवस्थित फेकला, ज्यावर अश्विनने २ धावा चोरल्या. अशाप्रकारे एक चेंडू ३ वेळा फेकला गेला. यादरम्यान राजस्थानचे २ फलंदाज धावबाद झाले व या एका चेंडूवर राजस्थान संघाला ४ धावाही मिळाल्या. या प्रसंगाचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक

बटलरचा ‘विराट’ विक्रम! ‘जोस द बॉस’ने २ षटकार ठोकताच कोहलीचा पत्ता केला कट

बॉल फेकतेय की योगा करतेय? मायाची बॉलिंग ऍक्शन पाहून डोकंच फिरेल; जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---