भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाला आठवा झटका बसला आहे. अर्धशतकवीर वृद्धिमान सहा ६७ धावांवर बाद झाला.
रंगाना हेराथच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डकवेललाने त्याला यष्टीचित केले. सहाने आपल्या खेळीत १३४ चेंडूंचा सामना केला.
सध्या भारत १५३ षटकांत ५७८/८ असून जडेजा ५३ धावांवर तर मोहम्मद शमी १ धावेवर खेळत आहेत.