भारतीय संघाचा यष्टीरक्षक स्टार फलंदाज रिषभ पंत अनेक दिवसांपासुन संघा बाहेर आहे. त्याचा अपघात झाल्या कारणाने त्याला दुखापत झाली होती. यामुळे तो अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. मात्र, रिषभ आता परतीच्या मार्गावर आहे. त्याने नेटमधील सरावासोबत आता जिममध्ये देखिल जाण्यास सुरवात केली आहे. त्याचा जिममधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) ने व्हिडिओ शेअर करत त्या खाली लिहले आहे की, “मला अंधार बोगद्यात थोडा प्रकाश दिसत आहे.” पंतच्या या कॅप्शनवरून असाही अंदाज लावला जाऊ शकतो की तो तंदुरुस्तीच्या अगदी जवळ आला आहे आणि त्याला लवकरात लवकर मैदानात परतायचे आहे. कार अपघातानंतर पंतने हळूहळू उंची वाढवली. आता त्यांच्यात बरीच सुधारणा झाली आहे. रिषभ अपेक्षेपेक्षा वेगाने बरा होत आहे. जर आपण त्याच्या पुनरागमनाबद्दल बोललो तर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तो जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघामध्ये परत येऊ शकतो.
Rishabh Pant is training hard to make a strong comeback! pic.twitter.com/Bl6yXyeYSW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2023
रिषभ भारताकडून तिन्ही प्रकारामध्ये खेळत असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वतःची छाप सोडली आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून भारतीय कसोटी संघाला पंतची योग्य जागा अद्याप सापडलेली नाही. अशा परिस्थितीत चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला होता. हा अपघात झाला तेव्हा रिषभ आपल्या घराकडे परतत होता. अपघातानंतर रिषभवर काही शस्त्रक्रिया झाल्या आणि हळूहळू तो बरा होण्याचा मार्ग सुरू झाला. त्याने आतापर्यंत भारतासाठी 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (wicketkeeper batsman rishabh pant gym video viral)
महत्वाच्या बातम्या-
ASIA CUP: नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकत भारताची प्रथम गोलंदाजी, संघात महत्वपूर्ण बदल
जायंट कॉर्नवॉलचे CPL मध्ये वादळ! ऐतिहासिक शतक ठोकत मुलाला दिले ‘बर्थ डे’ गिफ्ट