पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मोहम्मद रिझवान वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. पहिल्या वनडेत पराभव पत्करावा लागल्यानंतर संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन केलं. या सामन्यात रिझवानच्या नेतृत्वगुणांची चुणूक दिसली. तो सतत गोलंदाजीमध्ये बदल करत होता. याचा परिणाम असा झाला की विरोधी संघातील एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही.
रिझवाननं या सामन्यादरम्यान एक विशेष कामगिरी केली. तो एका वनडे सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा संयुक्त पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक ठरला आहे. त्यानं या बाबतीत संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा रेकॉर्ड मोडला. सरफराजनं ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेटच्या मागे सहा झेल घेतले होते. आता ॲडलेड ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिझवाननं सहा झेल घेत सरफराज अहमदच्या या विशेष विक्रमाची बरोबरी केली.
पाकिस्तानसाठी एका वनडे सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे यष्टिरक्षक
6 – मोहम्मद रिझवान – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ॲडलेड – 2024
6 – सरफराज अहमद – विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ऑकलंड – 2015
5 – मोईन खान – विरुद्ध झिम्बाब्वे – हरारे – 1995
5 – रशीद लतीफ – विरुद्ध श्रीलंका – डंबुला – 2003
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिजवाननं विकेटच्या मागे झेलबाद केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये स्टीव्ह स्मिथ (35), मार्नस लाबुशेन (6), ॲरॉन हार्डी (14), कर्णधार पॅट कमिन्स (13) आणि मिचेल स्टार्क (1) यांचा समावेश होता. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्ताननं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं 35 षटकांत अवघ्या 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्ताननं 26.3 षटकांत 169/1 धावा करून हे लक्ष्य सहज गाठलं.
हेही वाचा –
पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हाणलं, वनडे सामन्यात एकतर्फी विजय!
केएल राहुलचं हसं, खूपच विचित्र पद्धतीनं बाद; चाहत्यांना केली थेट बाबर आझमशी तुलना; VIDEO पाहा
रणजी ट्रॉफी खेळून फायदा काय? 6000 धावा आणि 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही!