---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत रिषभ फक्त फलंदाज म्हणून खेळणार? फलंदाजी प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्तर

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच 4 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. दौऱ्यातील शेवटच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक रिषभ पंत. रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभच्या या खेळीचे कौतुक होत असतानाच, इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याच्या संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत.

भारतीय खेळपट्टया फिरकीला मदत करत असल्याने फिरकी विरुद्ध रिषभच्या यष्टीरक्षण कौशल्याची नेहमीच चर्चा होत असते. फिरकी विरुद्ध रिषभच्या यष्टीरक्षण कौशल्यात सुधारणांची वाव असल्याने, त्याला एक प्रमुख फलंदाज म्हणूनही खेळवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.या सर्व प्रकरणाबद्दल फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राठोड म्हणाले,”रिषभचा भविष्यकाळात भारतीय संघात फार मोठी भूमीका असणार आहे. आम्ही नेहमीच मानले आहे कि रिषभ हा एक असाधारण खेळाडू आहे. रिषभला एक प्रमुख फलंदाज म्हणून संघात खेळवण्याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेले नाही.”

रिषभला संघाबाहेर ठेवणे संघ व्यवस्थापनाला तितकेसे सोपे असणार नाही. रिषभने संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने सिडनी येथील सामन्यात दुखापतग्रस्त असून देखील झुंजार खेळी केली. सामन्याच्या पाचव्या दिवशी रिषभने 112 चेंडूत 12 चौकार व 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 97 धावांची आक्रमक खेळी केली होती. इतकेच नाही तर रिषभने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शानदार 89 धावांची खेळी करत भारताला सामना जिंकून दिला होता. रिषभच्या या दोन्ही खेळ्या सर्व क्रिकेटप्रेमींच्या कायमच स्मरणात राहतील.

महत्त्वाच्या बातम्या –

पुजाराने केला खुलासा, ‘ब्रिस्बेन कसोटी संपूर्ण शरीरावर चेंडू आदळत होते, पण मी…’

अविश्वसनीय झेल…! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ खेळाडूने पकडला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी, राजस्थानचा पाडाव करत तामिळनाडू अंतिम फेरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---