---Advertisement---

विराटने बाहेर केलेल्या खेळाडूने मिळवून दिला रोमहर्षक विजय, ९ चेंडूत पालटला सामन्याचा नूर

On: सोमवार, मार्च 1, 2021 8:58 PM
---Advertisement---

पाकिस्तानमध्ये सध्या टी२० लीग अर्थात पाकिस्तान सुपर लीग २०२१ चा थरार चालू आहे. या हंगामातील अकरावा सामना रविवारी (२८ फेब्रुवारी) कराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात झाला. या रोमांचक सामन्यात लाहोरचा सलामीवीर फखर झमान याने ८३ धावांची अफलातून खेळी केली. यासह लाहोर कलंदर्सने ४ चेंडू व ६ गडी राखून सामना खिशात घातला. परंतु, झमानच्या या खेळीपेक्षा डेव्हिड विजेने केलेल्या आक्रमक खेळीने चाहत्यांची मने जिंकली.

लाहोरने मिळवला रोमहर्षक विजय
कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लाहोरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कराचीने शारजील खान (६४) व मोहम्मद नबी (५७) यांच्या अर्धशतकांच्या तसेच डॅनियल ख्रिस्टीयनच्या १४ चेंडूतील २७ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १८६ धावा फलकावर लावल्या.

प्रत्युत्तरात लाहोरकडून सलामीवीर फखर झमान (८३) आणि यष्टीरक्षक बेन डंक याच्या नाबाद ५७ धावांमुळे लाहोरने चार चेंडू राखून विजय मिळवला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अष्टपैलू डेव्हिड विजेने अवघ्या ९ चेंडूंमध्ये ३१ धावांचा तडाखा देत सामन्याला कलाटणी दिली. गोलंदाजीत तीन बळी टिपणाऱ्या शाहिन आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

विजेची आक्रमक खेळी
सलामीवीर फखर झमान ८३ धावा काढून बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू डेव्हिड विजे मैदानात दाखल झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी १६ चेंडूमध्ये ३५ धावांची आवश्यकता होती. मात्र, विजेने अवघ्या ९ चेंडूमध्ये ३१ धावा चोपून चार चेंडू बाकी असताना संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने तीन चौकार व तीन षटकार ठोकले.

आयपीएलमध्ये खेळला आहे विराटच्या नेतृत्वात
दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या डेव्हिड विजेने आयपीएलमध्ये देखील आपली कौशल्ये दाखवली आहेत. २०१५ व २०१६ आयपीएल हंगामात त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून भाग घेतला होता. यादरम्यान त्याने १५ सामन्यांमध्ये १२७ धावा व १६ बळी आपल्या नावे केले होते. २०१६ नंतर त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

महत्वाच्या बातम्या:

आर अश्विनचा वनडे संघात समावेश केल्यास भारताला मोठा फायदा होईल

नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, जाणून घ्या पहिल्या पाच क्रमांकावरील नावे

Video: पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतला! एका षटकात फिरला सामना, दिल्या तब्बल २० धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---