अलूर येथे भारत ब विरुद्ध आॅस्ट्रेलिया अ यांच्यातील पार पडलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया अ ने भारतावर डकवर्थ लूइस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात आॅस्ट्रेलिया अ कडून उस्मान ख्वाजा आणि जॅक वाइल्डरमुथने विजयात मोलाचा वाटा उचलला.
आॅस्ट्रेलिया अ ला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना वाइल्डरमुथने षटकार खेचत हा विजय मिळवून दिला. या विजयामुळे आॅस्ट्रेलिया अने चौरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
तसेच भारत ब संघाने याआधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन संघात बुधवारी 29 आॅगस्टला बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अंतिम सामना पार पडेल.
सोमवारी पार पडलेल्या सामन्यात वाइल्डरमुथने 42 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच हे त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे.
त्याने या धावा ख्वाजाबरोबर 93 धावांची भागिदारी करताना केल्या. ख्वाजाने या सामन्यात 93 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 101 धावा केल्या.
आॅस्ट्रेलिया अ संघाला भारतीय ब संघाने 50 षटकात 277 धावांचे आव्हान दिले होते. परंतू आॅस्ट्रेलिया अ संघ 24.1 षटकात 4 बाद 132 धावांवर असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे डकवर्थ लूइस नियमानुसार त्यांना 40 षटकात 247 धावांचे आव्हान देण्यात आले.
या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलिया अ 5 बाद 155 धावा असा संघर्ष करत होता. यावेळी ख्वाजा आणि वाइल्डरमुथने नाबाद अर्धशतकी भागिदारी करत विजय मिळवून दिला.
मात्र या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. अन्य फलंदाजांपैकी अॅलेक्स कारे(23), ट्रेविस हेड (5), पीटर हँड्सकॉम्ब (2), मार्नुस लॅबुसचेंज (13) आणि अॅश्टोन एगरने (15) धावा केल्या.
भारत ब संघाकडून जलज सक्सेनाने 2 तर कुलवंत खेज्रोलिआ, श्रेयश गोपाळ आणि दिपक हुडा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी भारत ब संघाकडून कर्णधार मनिष पांडेने शानदार नाबाद शतक झळकावले होते. त्याने 109 चेंडूत 117 धावा करताना 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्याचबरोबर अन्य फलंदाजांपैकी मयंक अगरवाल(36), इशान किशन(31), शुभमन गिल(4), केदार जाधव(5), दिपक हुडा(30), जलज सक्सेना(18) आणि श्रेयश गोपाळ(12*) यांनी धावा करत भारत ब संघाला 50 षटकात 6 बाद 276 धावांचा टप्पा गाठून दिला होता.
आॅस्ट्रलिया अ संघाकडून मायकेल नेसेरने 3 विकेट्स घेतल्या तर अन्य गोलंदाजांपैकी झे रिचर्डसन, मिशेल स्वीपसन आणि जॅक वाइल्डरमुथ प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक
–एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक