---Advertisement---

SRH vs DC: दिल्ली विरुद्ध हैदराबाद कोण मारेल बाजी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स

On: सोमवार, मे 5, 2025 2:34 PM
---Advertisement---

सनराइजर्स हैदराबाद स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा दुसऱ्या संघावर अवलंबून आहेत. जर आजच्या सामन्यात ते पराभूत झाले तर, प्लेऑफच्या रेसमध्ये बाहेर होणारी तिसरी हैदराबाद टीम बनेल. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात चांगली झाली. पण मागच्या काही सामन्यात संघाला मिळालेल्या पराभवानंतर संघ अडचणीत सापडताना दिसत आहे.

दिल्लीने मागच्या सामन्यात 4 मधील 3 सामने गमावले आहेत. आता उरलेले सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तसेच नेट रन रेट सुद्धा महत्वाचा ठरेल.

हा सामना रोमांचक ठरेल कारण मिचेल स्टार्क आणि ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यामध्ये चांगली चुरस पाहायला मिळू शकते.

सनराइजर्स हैदराबाद संघ त्यांच्या फलंदाजांवर अवलंबून राहतो आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी चांगले खेळणे महत्वाचे ठरेल. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. तसेच दिल्लीसाठी मधल्या फळीत कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी असेल.
दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज के एल राहुल, फाफ डू प्लेसिस यांना चांगली सुरुवात करावी लागेल.

दिल्ली आणि हैदराबाद संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये 13 हैदराबाद तसेच 12 दिल्लीने जिंकले आहेत.
आज 5 मे रोजी हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना हैदराबाद हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---