अफगाणिस्तान संघ ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या मार्गावर आहे. अफगाणिस्तान संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे. पण अफगाणिस्तान संघासाठी हा मार्ग सोपा नसणार आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये शुक्रवारी लाहोर मध्ये हा सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेतील हा दहावा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अफगाणिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. पण या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना 107 धावांनी जिंकला होता. पण यानंतर अफगाणिस्तान संघाने जोरदार पुनरागमन करून इंग्लंड संघाला हरवले. इंग्लंड संघाला हरवून अफगाणिस्तानने त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे.
जर ब गटातील पॉईंट्स टेबल पाहिले तर दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांनी एक -एक सामना जिंकलेला आहे आणि एक-एक सामना रद्द झाला आहे. या दोन्ही संघांकडे तीन-तीन पॉईंट्स आहेत. जर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी अफगाणिस्तानला पराभूत केले, तर हा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. तसेच अफगाणिस्तान संघ जिंकला तर तो उपांत्य फेरीत पोहोचेल. अफगाणिस्तानसाठी हा सामना करा किंवा मरा असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ: –
ऑस्ट्रेलिया : मैथ्यू शॉर्ट, ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोस इंग्लिश (यष्टीरक्षक), एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, एडम जाम्पा, स्पेंसर जॉनसन, जेक फ्रेसर-मॅकगर्क, आरोन हार्डी, सीन एबॉट, तनवीर सांघा
अफगानिस्तान : रहमानउल्ला गुरबाज़ (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरजई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, राशिद खान, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद अहमद मलिक, इकराम अलीखिल, नांगेयालिया खारोटे, नवीद जादरान
हेही वाचा
“क्रिकेट आणि परंपरेचा संगम! भारत-न्यूझीलंड सामन्यात प्रेक्षकांना मोफत इफ्तार बॉक्स”
अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपूर्ण रणनीती तयार – हसमतुल्लाह शाहिदी
“दिल्ली कॅपिटल्समध्ये पीटरसनची एंट्री, हिंदीत पोस्ट शेअर करून दिला खास संदेश!”