---Advertisement---

एसआरएचविरुद्ध कर्णधार अक्षर खेळणार का? डीसीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

On: मंगळवार, एप्रिल 21, 2026 5:47 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आज (मंगळवार, २१ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना होणार आहे. हा सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरूवात होणार आहे. या सामन्यात डीसीचा कर्णधार अक्षर पटेल खेळणार की नाही, याबाबतची महत्त्वाची माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी दिली आहे.

अक्षरला १८ एप्रिलला खेळण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्या सामन्यात डीसी १७६ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती आणि अक्षरला फलंदाजी करताना क्रॅम्प्सचा त्रास झाला. यामुळे त्याने रिटायर-हर्ट होत मैदान सोडले. त्यानंतर त्याला पुन्हा मैदानात यावे लागले नाही, कारण ट्रिस्टन स्टब्स आणि डेविड मिलर यांनी संघाला विजय मिळवून दिला. आता तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याचे स्पष्टीकरण बदानी यांनी दिले आहे.

बदानी यांनी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अक्षरच्या दुखापतीचे अपडेट दिले. ते म्हणाले, “सर्व काही ठीक आहे. तो खेळण्यासाठी फिट आहे.”

अक्षर मैदानावर परतणार असे बदानी यांच्या वक्तव्यावरून कळते, मात्र तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करू शकेल का, हे सामन्यावेळी कळेलच. डीसीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. यामध्ये अक्षरने ५ विकेट्स घेतल्या असून २९ धावा केल्या आहेत.

या पत्रकार परिषदेत बदानी यांनी मिलरची गुजरात टायटन्स विरुद्ध एक धाव नाकारल्यानंतर झालेल्या पराभवाची पाठराखण केली आहे. तो सामना डीसीने एका धावेने गमावला होता. त्या सामन्यात डीसीला शेवटच्या २ चेंडूवर २ धावांची आवश्यकता असताना मिलरने दुसऱ्या बाजूला असलेल्या कुलदीप यादवला एकेरी धाव घेण्यास मनाई केली. त्याबद्दल बदानी म्हणाले, “मला अजूनही विश्वास आहे की त्याने योग्य निर्णय घेतला. आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि दोन सामन्यांमध्ये त्याने तो विश्वास आम्हाला दाखवून दिला आहे.”

डीसीच्या शेवटी झालेल्या सामन्यात मिलरने आरसीबीविरुद्ध शेवटच्या षटकात १५ धावांची आवश्यकता असताना दोन षटकार आणि एक चौकार मारला. बंगळुरूमध्ये झालेला तो सामना डीसीने ६ विकेट्सने जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---