भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील दुसरा सामना दिल्ली स्थित अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू होईल. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर याला संधी मिळणार नसल्याचे बोलले जात होते. यावर त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स याने स्पष्टीकरण दिले.
डेविड वॉर्नर (David Warner) मागच्या काही कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले आहे. यावर्षीच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉर्नरने 1 आणि 10 असे प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर उभय संघांतील दुसरा सामना वॉर्नरला बेंचवर बसवून खेळला जाईल, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. पण कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins ) याने सांगितल्यानुसार वॉर्नर दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे. “मी निवडकर्ता नाहीये. पण मला असेही नाही वाटत की निवडकर्त्यांची एखादी बैठक झालीये. मला विश्वास आहे की, डेवि (वॉर्नर) दुसरा कसोटी सामनाही खेळेल. आपण पाहिले आहे, जेव्हा तो विरोधी संघावर दबाव बनवतो, तेव्हा त्याच्यापुढे गोलंदाजी करणे खूप कठीण असते,” असे कमिन्स म्हणाला.
“वॉर्नर खरोखर चांगली फलंदाजी करत आहे. एवढेच नाही नेतृत्वाच्या बाबतीत देखील तो मला चांगला वाटतो. फिरकी गोलंदाजीविषयी खूपकाही बोलले जात आहे, हे मलाही माहितीये. पण नवीन चेंडूवर फलंदाजी करणेही कधी-कधी खूप कठीण असते.” नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय फिरकीपटूंपुढे पूर्णपणे अपयशी ठरला होता. नागपूर कसोटीनंतर आता दिल्लीतील (IND vs AUS 2nd Test Match) खेळपट्टी देखील फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याची शक्यता कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन संघाला आहे.
“खेळपट्टीविषयी निश्चित काही बोलता येणार नाही. ही खेळपट्टीव पूर्णपणे वेगळ्या मातीची आहे. पण त्याला आशा आहे की, ईथेही नागपूरप्रमाणेच परिस्थिती असेल. याठिकाणीही चेंडू स्पिन होण्याची शक्यता आहे,” असे कर्णधार कमिन्स पुढे म्हणाला. (Will David Warner play in the second test or not? Captain Pat Cummins replied)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“बीसीसीआयपुढे आयसीसीही काही करू शकणार नाही…”, आशिया चषक वादावर बोलला आफ्रिदी
सात डावांमध्ये तीन शतकांसह कुटल्या 569 धावा, हैदराबादच्या फलंदाजाची कसोटीत टी-20 सारखी फलंदाजी