चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक खेळीमुळे इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेतील इंग्लंड संघाचा अंतिम सामना आणि जॉस बटलरचा कर्णधार म्हणून शेवटचा वनडे सामना असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी इंग्लंड संघाचा भारत दौरा सुद्धा निराशाजनकच झाला. जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने भारतीय संघाविरुद्ध वनडे मालिका 0-3 ने गमावली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडल्यानंतर जॉस बटलरवर अधिक दबाव वाढला आहे. आधीपासूनच म्हटले जात होते की जॉस बटलर कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. शनिवारी इंग्लंडचा स्पर्धेतील शेवटच्या सामना आधी शुक्रवारी बटलरने अधिकृतरित्या कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सांगितला आहे.
जॉस बटलर पत्रकार परिषदेत म्हणाला की, मी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडत आहे. हा निर्णय माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य आहे. मला आशा आहे की दुसरा कर्णधार ब्रेंडन मैकुलम सोबत या संघाला तिथे घेऊन जाईल जिथे त्याला जायला पाहिजे.
बटलर पुढे म्हणाला, अजूनही दुःख आणि निराशेची भावना मनात आहे. पण मला विश्वास आहे की वेळेनुसार सगळं सुरळीत होईल आणि मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेऊ शकेन आणि हा विचार सुद्धा करू शकेल की आपल्या देशाचे नेतृत्व करणे किती मोठा सन्मान आहे.
जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाकडून खराब खेळातील प्रदर्शनाची अपेक्षा नव्हती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 351 धावांची संख्या करून सुद्धा संघ 5 विकेट्सनी पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यात संघ मोठ्या उलटफेरीचा शिकार झाला. अफगाणिस्तानने इंग्लंडला 8 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर इंग्लंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बाहेर पडला आहे.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा, कांगारू संघाचा लज्जास्पद रेकॉर्ड!
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल? ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार संधी?
पाकिस्तान-बांग्लादेशचं वर्चस्व संपलं? आता आशियातील भारतानंतर सर्वश्रेष्ठ टीम कोणती?






