---Advertisement---

IND vs NZ Final: भारत न्यूझीलंडकडून टी-20 वर्ल्ड कप फायनल हारणार? जाणून घ्या किवींविरुद्धचा रेकॉर्ड काय सांगतो?

On: शनिवार, मार्च 7, 2026 6:11 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड (India vs Newzealand final) यांच्यातील 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी, 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. 2024 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतासाठी यंदाची ट्रॉफी राखणे सोपे नसेल, कारण समोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान आहे.

आयसीसी (ICC) फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. जरी भारताने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून जेतेपद पटकावले असले, तरी इतिहास काही वेगळेच सांगतो. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वेळा आयसीसी स्पर्धांचे फायनल सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंडचे पारडे जड असून त्यांनी 2 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर भारताला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. साल 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमधील हा पहिला फायनल सामना होता, ज्यात न्यूझीलंडने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. तर, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये या दुसऱ्या फायनलमध्येही न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने मात केली. पण त्यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत या तिसऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाने प्रथमच न्यूझीलंडला नमवले आणि 4 विकेट्सने सामना जिंकून विजेतेपद मिळवले.

भारत आणि न्यूझीलंड या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचताच एक अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटच्या (कसोटी, वनडे आणि टी-20) फायनलमध्ये एकमेकांसमोर येणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे. कसोटी (WTC) आणि वनडे (चॅम्पियन्स ट्रॉफी) मध्ये यापूर्वीच त्यांचे फायनल सामने झाले आहेत, आता टी-20 मध्येही हे दोन संघ भिडणार आहेत. आता या ऐतिहासिक लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---