---Advertisement---

हैदराबादने आरसीबीचा उडवला धुव्वा! 55 धावांनी पराभव, तरीही बंगळुरू टॉपवर

On: शनिवार, मे 23, 2026 8:03 AM
---Advertisement---

SRH vs RCB: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 67वा लीग सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 55 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या फलंदाजांनी 20 षटकांत 255 धावांची विशाल धावसंख्या उभारून कर्णधाराचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला.

सनरायझर्स हैदराबादला स्फोटक सुरुवात करून देताना, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी रचली; त्यानंतर हेड २६ धावा काढून बाद झाला. या नंतर फलंदाजीला आलेल्या ईशान किशनने अभिषेकला उत्तम साथ दिली आणि या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा अखेर 56 धावांची खेळी करून बाद झाला. 97 धावांवर असताना हैदराबादने आपला दुसरा गडी गमावला; त्यानंतर हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला आणि त्याने त्वरित आक्रमक पवित्रा घेत धावांचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला.

ईशान आणि क्लासेन यांच्यात तिसऱ्या गड्यासाठी 113 धावांची शानदार भागीदारी झाली, जी केवळ 48 चेंडूंमध्ये आली. या सामन्यात क्लासेनने 51 धावांचे योगदान दिले, तर ईशान किशनने 79 धावांची अप्रतिम खेळी साकारली; याव्यतिरिक्त, नितीश रेड्डीने केवळ 12 चेंडूंमध्ये 29 धावांची एक जलद आणि नाबाद खेळी खेळली. गोलंदाजीत, आरसीबीकडून रसिक सलाम दारने 2 बळी घेतले, तर सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर या त्यांच्या सलामीच्या जोडीने डावाला शानदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी रचली. व्यंकटेश अय्यर 44 धावा काढून तंबूत परतला; त्यानंतर काही वेळातच विराट कोहलीही 15 धावांचे योगदान देऊन बाद झाला. आऱसीबीकडून, कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात 56 धावांची खेळी केली; मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीला आपल्या 20 षटकांत 4 गडी गमावून 200 धावांची एकूण धावसंख्या गाठता आली. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीत, ईशान मलिंगाने 2 गडी बाद केले, तर साकिब हुसेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---