भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येते खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळाल्याने भआरताने मालिका विजय निश्चित केला आहे. त्यामुळे आता शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना भारताचा माजी दिग्गज अजय जडेजाने आपले मत व्यक्त केलं आहे.
“सध्या भारतीय संघाचा अंदाज बांधणे कठीण आहे कारण संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे याची आपल्याला कल्पना नाही. मला वाटले आवेश खानला संधी द्यायली हवी. केएल राहुल फलंदाजीच्या सरावासाठी खेळला पाहिजे. मात्र, कोण खेळणार हे अद्याप कळलेले नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होईल, असे मला वाटत नाही. खूप बदल होतील असं सगळ्यांना वाटतंय पण मला तसं वाटत नाही”, असं जडेजा म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
गरजेवेळी शार्दुल ठाकुरला कशी मिळते विकेट? गोलंदाजाने स्वतःच केलाय खुलासा
धोनी जे ३५० वनडेत करू शकला नाही, ते संजूने सहाव्याच सामन्यात केलं; ठरलाय पहिलाच भारतीय