---Advertisement---

इंग्लंडच्या फलंदाजाने घातलाय राडा! अवघ्या शंभर बॉलच्या सामन्यात २२५च्या स्ट्राईक रेटने झळकावले शतक

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 3:02 PM
Will-jack-the-hundred
---Advertisement---

क्रिकेटमध्ये आपण आजवर अनेक तुफानी फलंदाज पाहिले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या खेळाने एक विशिष्ट उंची गाठली आहे. प्रामुख्याने टी-२० क्रिकेट निर्माण झाल्यापासून खेळातील आक्रमकता वाढली आहे. त्यानंतर गेल्टया काही वर्षात द हंड्रेड आणि टी-२० सारख्या लीगमुळे खेळाडूंची फलंदाजी अभिक तुफानी झाल्याचे पाहायला मिळत असते. अशाच एका फलंदाजाने द हंड्रेड स्पर्धेत तुफानी फलंदाजीच्या जोरावर थेट शतक झळकावले आहे.

ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघाचा सलामीवीर विल जॅकने द हंड्रेड लीगमध्ये सदर्न ब्रेव्हविरुद्ध झंझावाती शतक ठोकले आहे. १०० चेंडूंच्या या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी विल स्मेडने काही दिवसांपूर्वी शतकी खेळी खेळली होती. मात्र, विल जॅकने सर्वात जलद शतक आणि द हंड्रेड लीगमधील सर्वोच्च धावसंख्याही ठोकली. आणि घरच्या मैदानावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

सलामीवीर विल जॅकने ४७ चेंडूत शतक झळकावले, तर तो ४८ चेंडूत १०८ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने १० चौकार आणि ८ षटकार मारले. त्याचा स्ट्राईकरेट २२५ इतका होता. त्याचवेळी, त्याच्या आधी, विल स्मेडने हंड्रेड लीगमध्ये ५० चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह शतक झळकावले. त्याच मोसमात डेव्हिड मालाने मँचेस्टर ओरिजिन्सविरुद्ध ट्रेंट रॉकेट्सकडून नाबाद ९८ धावांची खेळी केली.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सदर्न ब्रेव्हने १०० चेंडूत ६ गडी गमावून १३७ धावा केल्या. सदर्न ब्रेव्हकडून मार्कस स्टॉइनिसने ३७ धावा केल्या, तर टीम डेव्हिडने २२ धावा केल्या. ओव्हलकडून रीस टोपलेने तीन बळी घेतले. त्याचवेळी ओव्हलच्या संघाने ८२ चेंडूत ३ गडी गमावून १३८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यात जॅकच्या १०८ धावा, तर सॅम करनच्या ११ धावांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

का ‘कॅप्टनकूल’ने निवृत्तीसाठी निवडली होती ७.२९ ही वेळ? घ्या जाणून कारण

वॉर्नरचं भारतप्रेम हृदयास भिडणारं! भारताच्या स्वातंत्र्यदिनी फोटो शेअर करत दिल्या हटके शुभेच्छा

१५ ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---