आयपीएल 2020 च्या समाप्तीनंतर आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष आयपीएल 2021 कडे लागले आहे. 2021 मध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार असून अनेक संघात मोठे बदल होऊ शकतात. अशातच मागील काही महिन्यांपासून बातमी समोर येत होती की, न्यूझीलंडचा स्टार बॅट्समन केन विलियम्सन आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघ सोडून इतर संघांमध्ये जाणार आहे.
मात्र या चर्चेला पूर्णविराम देत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केले की विलियम्सन हा हैदराबाद संघाकडूनच खेळणार आहे.
ट्विटरवर एका क्रिकेट चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला प्रश्न केला की, आम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकतोय, विलियम्सन हा दुसऱ्या संघाकडून खेळणार आहे, त्यामुळे स्पष्ट करा की विलियम्सन हैदराबादकडून खेळणार आहे की नाही. यावर वॉर्नने ट्विट करत स्पष्ट केले की विलियम्सन हा आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडूनच खेळणार आहे.
First I have heard of this. Kane will not be going anywhere https://t.co/FokAQLJsmC
— David Warner (@davidwarner31) December 22, 2020
विलियम्सन सध्या आगामी पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. 26 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष विलियम्सनच्या कामगिरीकडे असणार आहे. पालकत्व रजा घेऊन विलियम्सन काही काळ कसोटी क्रिकेट पासून दूर होता, मात्र तो पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात परतणार आहे.
दुसरीकडे विलियम्सचा हैदराबाद संघातील कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा दुखापतीतून सावरत असून भारताविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात समाविष्ट होण्यासाठी मेहनत घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबारे, ही कसली भानगड..! भारत सरकारमुळे बीसीसीआयला होऊ शकते तब्बल ९०५ कोटींचे नुकसान
मी नाही, माझं कामच बोलेल…! निवड समीतीचे प्रमुख चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
व्हिडिओ : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली सर्वात भारी भेट