राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी (२० मे) आयपीएल २०२२चा ६८वा साखळी फेरी सामना खेळला गेला. उभय संघांचा हा आयपीएलमधील शेवटचा साखळी फेरी सामना होता. तसेच चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी याचाही हा शेवटचा आयपीएल सामना ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु स्वत: धोनीने या सामन्यापूर्वी आपल्या उपलब्धेतबद्दल माहिती दिली आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यावेळी नाणेफेकीसाठी गेला असताना धोनीने (MS Dhoni) आपण पुढील आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याबद्दल प्रतिक्रिया (MS Dhoni IPL Retirement) दिली आहे. “नक्कीच, यामागे एक साधेसोपे कारण आहे. जर मी चेन्नईत न खेळताच आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर हा चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीवर एकप्रकारे अन्यायच असेल,” अशी प्रतिक्रिया धोनीने दिली. यापूर्वी चेन्नई फ्रँचायझीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात धोनीने आपण चेन्नईच्या मैदानावर शेवटचा आयपीएल सामना खेळणार असल्याचे सांगितले होते.
आशा आहे की, ही एक संधी असेल जिथे संघ प्रवास करतील आणि म्हणून मी सर्व ठिकाणांना धन्यवाद म्हणू शकेल. हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल की नसेल, हा खूप मोठा प्रश्न असेल. कारण आपण वास्तवात २ वर्षांबाबतची भविष्यवाणी नाही करू शकत. परंतु निश्चितपणे मी पुढील वर्षी आयपीएलमधून मजबूत पुनरागमन करण्यासाठी भरपूर मेहनत घेईल, असेही धोनीने म्हटले.
Y. E. S! 👏 👏
𝗠𝗦 𝗗𝗵𝗼𝗻𝗶 𝗪𝗶𝗹𝗹 𝗕𝗲 𝗕𝗮𝗰𝗸! 💛 💛
Follow the match ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK | @msdhoni | @ChennaiIPL pic.twitter.com/mdFvLE39Kg
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलीय निवृत्ती
धोनी सध्या ४० वर्षांचा असून त्याने २ वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. अचानक १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयाने सर्वांना अचंबित केले होते. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तसेच त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली चेन्नईला पाच वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वात चेन्नई २०१० आणि २०१४ मध्ये चँपियन्स लीग विजेती बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली बनला अंडरटेकर! शुबमन गिलला पाहून केलेला ‘तो’ इशारा कॅमेऱ्यात कैद
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
पुन्हा फॉर्मात परतत विराटला टीम इंडियाला जिंकून द्यायचाय विश्वचषक, ब्रेकबद्दलही दिलीय प्रतिक्रिया