---Advertisement---

UAE vs PAK: पाक-अमेरिका लढतीचा थरार! कोलंबोत रंगणार महामुकाबला; भारतात ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 10:50 PM
PAKISTAN vs AMERICA
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना 10 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध (USA) खेळणार आहे. हा सामना कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. या खेळपट्टीवर धावा करणे कठीण असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. मागच्या विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तानला हरवून सर्वांना धक्का दिला होता, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे (America vs Pakistan).

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जरी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांचे इतर सामने भारतात पाहता येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. सामन्याचा टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वर पाहता येईल. तर मोबाईलवर हा सामना जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर पाहता येईल.

2024 च्या टी-20 विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळेस पाकिस्तानचा संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, अमेरिकेने पहिल्या सामन्यात भारताला ज्या प्रकारे कडवी झुंज दिली, ते पाहता पाकिस्तानसाठी हे आव्हान सोपे नसेल. अमेरिका हा सामना जिंकून स्पर्धेतील आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---