---Advertisement---

फिल सॉल्ट आयपीएल 2026 च्या उर्वरित सामन्यांत खेळणार नाही? मोठी अपडेट आली समोर

On: रविवार, मे 17, 2026 11:54 AM
---Advertisement---

आज (१७ मे) आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ६१ वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा खेळला जाणार आहे. धरमशालेत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबी जिंकला, तर ते प्लेऑफ्ससाठी पात्र होणार आहेत. अशात या महत्वाच्या सामन्यात आरसीबीची स्फोटक सलामीवीर फिल सॉल्ट खेळणार की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.

आधीच्या माहितीनुसार, सॉल्ट भारतात परतला होता, मात्र आता ताज्या अपडेटनुसार तो अजूनही यूकेमध्येच आहे. यामुळे तो या हंगामातील आरसीबीच्या उर्वरित लीग सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. त्याला १८ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यावेळी बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्कॅनसाठी इंग्लंडला परतला होता.

सॉल्ट भारतात परतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती, हे वृत्त क्रिकबजने दिले होते. आता मात्र ताज्या माहितीनुसार तो भारतात परतलेला नसून सध्या इंग्लंडमध्येच आहे. या वृत्ताला ईएसपीएन क्रिकइन्फोने दुजोरा दिला आहे. एका रिपोर्ट्सनुसार, सॉल्ट प्लेऑफ्सच्या सामन्यापूर्वी स्पर्धेत सहभागी होणार नाही. आरसीबीचे दोन गट सामने बाकी आहेत आणि या सामन्यांसाठी त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. तसेच आरसीबीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दुखापतीआधी सॉल्ट या आयपीएल हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने सहा सामने खेळले असून त्यामध्ये १६८.३३ च्या स्ट्राईक रेटने २०८ धावा केल्या होत्या. त्याने केवळ फलंदाजीतच नाहीतर क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली होती. त्याने काही अप्रतिम झेल घेतले आणि त्याचबरोबर संघासाठी महत्त्वपूर्ण धावाही वाचवल्या.

सॉल्टच्या अनुपस्थितीत जेकब बेथेल हा विराट कोहलीसोबत सलामीला फलंदाजी करत असून तो मात्र चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा डावांमध्ये केवळ ८५ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---