न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सराव करताना रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला असून याच कारणामुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या उजव्या पोटाच्या भागात दुखापत झाली असून, यामुळे आता तो काही काळ मैदानाबाहेर राहणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात त्याच्या जागी ध्रुव जुरेलची एन्ट्री झाली आहे. आता पंत मैदानावर कधी पुनरागमन करणार, असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे.
रिषभ पंतची दुखापत गंभीर असून त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारण अडीच महिन्यांचा काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, तो दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीचे सामने मुकण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीच्या संघात पंतचे नाव नाही. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता, तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आयपीएलद्वारे मैदानावर धमाकेदार पुनरागमन करू शकतो. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.






