भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शुक्रवार (2 ऑगस्ट) रोजी दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. कोलंबो या मैदानावर हा सामना रंगणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढताना दिसत आहे. कारण संघात यष्टीरक्षक म्हणून संधी कोणाला द्यायची? परंतू या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की असं टेन्शन असणं चांगली गोष्ट आहे.
सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) यावर उत्तर देताना सांगितले की, राहुल आणि रिषभ यांच्यातील एकाची निवड कशी करणार? तो म्हणाला, “हा एक कठीण निर्णय आहे. ते दोघंही उत्कृष्ट खेळाडू आहेत. तुम्हाला दोन्ही खेळाडूंच्या क्षमता माहित आहेत. तुमच्यात अशी गुणवत्ता असताना संघ किंवा खेळाडू निवडणे सोपे नाही. त्यांनी भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत.”
पुढे बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “संघ निवडण्यात अडचण येणं नेहमीच चांगलं असतं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही कोणाला निवडावे आणि कोणाला निवडू नये याबद्दल बरेच काही बोलता, याचा अर्थ संघात गुणवत्ता आहे. त्यामुळे अशा अडचणी येणं ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि मी जोपर्यंत कर्णधार आहे तोपर्यंत अशा अडचणींची वाट पाहीन.”
रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीतून परत येण्याआधी केएल राहुलनं (KL Rahul) यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली. राहुलनं विकेटसमोर आणि विकेटच्या मागं देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र आता पंतचं पुनरागमन झाल्यानं गंभीर या डावखुऱ्या फलंदाजाला प्राधान्य देतो की मागील संघ व्यवस्थापनाप्रमाणे राहुलवर विश्वास ठेवतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री मिळवून देण्यासाठी खासदार मोहोळ मैदानात
सर्वोत्तम कर्णधार कोण रोहित की धोनी? भारताच्या दिग्गज खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस