रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघ मागच्या 10 आयपीएल हंगामात खेळला. यातील पाच आयपीएल हंगाम मुंबईने जिंकले देखील. पण आगामी हंगामासाठी फ्रँचायझीने हार्दिक पंड्या याला कर्णधार म्हणून निवडले आहे. असात अनेकांकडून रोहितला आयपीएल 2024 साठी संघ बदलण्याचा सल्ला दिला जात आहे. चला तर जाणून घेऊ रोहित आयपीएल 2024 मध्ये मुंबई सोडून दुसऱ्या संघासाठी खेळू शकतो की नाही.
रोहित शर्मा याने आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा होती. पण शुक्रवारी (16 डिसेंबर) ऐन वेळी फ्रँचायझीकडून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचा नवा कर्णधार असल्याचे सांगितले गेले. सोशल मीडियावर या निर्णयानंतर चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. लोखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले आहे. असे असले तरी, फ्रँचायझीने घेतलेला निर्णय बदलणे शक्य नाही.
तसेच रोहित शर्माही आगामी हंगामात मुंबईला सोडू शकत नाही. कारण खेळाडूंना ट्रेड करण्यासाठी शेवटची तारीक 12 डिसेंबर होती. या तारखेपर्यंतच संघ आपल्या खेळाडूंना रिलीज किंवा रिटेन करू शकत होते. मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून काढले, पण संघातून रिलीज केले नाहीये. तसेच रोहितने सुद्धा मुंबईचा साथ सोडली नाहीये. आयपीएल 2024 साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आपले नाव आधीच नोंदवावे लागते. रोहितने मात्र यासाठी नाव नोंदवले नाहीये. अशात आगामी हंगामात रोहित दुसऱ्या संघासाठी खेळण्याच्या चर्चा निरर्थक ठरतात.
रोहितने 2011 साली मुंबई इंडियन्ससाठी पहिला सामना खेळला होता. 2013 आयपीएलमध्ये त्याला पहिल्यांदा मुंबईचे कर्णधारपद मिळाले. मागच्या 10 वर्षांमध्ये त्याने स्वतःला आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार बनवले. एमएस धोनी यानेही पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण रोहितच्या तुलनेत धोनीला या ट्रॉपी जिंकण्यासाठी जास्त सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडावी लागली. (Will Rohit leave Mumbai Indians and join IPL 2024 auction? Read in detail)
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा कॅप्टन्सीवरुन काढलं तेव्हा रोहित अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये काय करत होता?
रोहित ठरला क्रिकेटच्या मैदानातील शिवराज सिंग चौहान; आपल्यांनीच सोडली साथ! वाचा सविस्तर…






