मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज खेळाडू आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रोहित आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी मागचा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. आता संघाचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघासोबत होणार आहे. रोहित या सामन्यात खेळू शकतो. मुंबईचे प्रशिक्षक महिला जयवर्धन यांनी रोहित विषयी मोठी अपडेट सांगितली आहे.
रोहित विषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पत्रकार देवेंद्र पांडे यांनी एक्सवर याबद्दल माहिती दिली आहे. रोहित विषयी मुंबई इंडियन्सचे हेड कोच जयवर्धन म्हणाले, रोहित आता ठीक आहे, तो चांगल्या कंडीशन मध्ये दिसत आहे. तो आज सरावादरम्यान फलंदाजी करणार होता. रोहित लखनऊ विरुद्ध खेळू शकला नव्हता. तो सरावादरम्यान दुखापती झाला होता. रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, पण आता तो आरसीबी विरुद्ध सामन्यात मैदानावर उतरू शकतो. मुंबई आणि आरसीबीचा सामना सोमवार 7 एप्रिल रोजी होणार आहे.
मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जर रोहित शर्माचे पुनरागमन होत आहे, तर त्याच्या जागी कोणत्याही एका खेळाडूला बाहेर जावे लागेल. मुंबई विल जॅक्स किंवा राज बावा यांच्यापैकी कोणालातरी बाहेर ठेवू शकते. विल जॅक्सने आत्तापर्यंत हंगामात तीन सामने खेळले आहेत पण या दरम्यान तो कोणतीही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. जॅक्सने लखनऊ विरुद्ध फक्त 5 धावा केल्या. याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
रोहित शर्माची आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात झालेली नाही. तो हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध 0 वरच बाद झाला. यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध तर फक्त 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सुद्धा तो काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्याने फक्त 13 धावा केल्या.






