भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर आहे. शमी आपल्या घातक गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकत आला आहेच. पण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे काही बोलला, ज्यामुळे चाहत्यांच्या नजरेत शमीचा दर्जा अधिकच उंचावला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी () मागच्या वर्षी संघासाठी महत्वाचा ठरला. मागच्या वर्षी भारतीय संघाने मायदेशात वनडे विश्वचषक खेळला. मोहम्मद शमी याने विश्वचषक हंगामात भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. शमीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरच भारताने अजिंक्य राहत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्यानंतर मात्र शमी संघातून बाहेर आहे.
नुकतेच अयोध्येत राम मंदीर प्राण प्रतिष्ठा समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी अनेक नामांकीत व्यक्ती अयोध्येत उपस्थित राहिल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमीला देखील राम मंदीर आणि हिंदुत्वाशी संबंधित प्रश्न विचारला गेला होता. शमीने या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले. मोहम्मद शणी मुलाखतीदरम्यान म्हणाला, “आज तुमचे मंदीर बनून तयार होत आहे, तर जय श्रीराम म्हणायला काय हरकत आहे. हजार वेळा जय श्रीराम म्हणून शकता. हजार वेळा य श्रीराम म्हणा. जर मला अल्लाह-हू-अकबर म्हणायचे असेल, तर मी म्हणणारच. या गोष्टींचा कुणालच काही फरक पडत नाही.”
शमीने पुढे धार्मिक तेढ निर्णाय करणारे आणि दंगली घडवणाऱ्यांविषयी देखील प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते प्रत्येक धर्मात काही ठराविक संखेत अशी लोक असतात, ज्यांना दुसऱ्या धर्माचे लोक आवडत नाहीत. मला यात काहीच अडचण नाही. (‘Will say 1000 times’, Mohammed Shami’s big statement about Ram temple, won the hearts of all Ram devotees)
महत्वाच्या बातम्या –
रविवारी जामनेरमध्ये उसळणार कुस्तीप्रेमाचा जनसागर, खासबाग अखाड्याच्या धर्तीवर स्टेडियमची निर्मिती
Tom Moody : टॉम मूडी यांचा दावा; म्हणाले, T20 विश्वचषकासाठी आयपीएलची कामगिरी महत्त्वांची