भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना नाट्यमय पद्धतीनं टाय झाला. मात्र, त्यानंतर सुपर ओव्हर झाला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. नंतर बातम्या आल्या की, या सामन्यासाठी सुपर ओव्हरचा नियम होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता याबाबत आणखी एक मोठं अपडेट समोर येत आहे. वृत्तानुसार, भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे सामना टाय झाल्यास यावेळी सुपर ओव्हर घेण्यात येईल.
पहिल्या वनडेत श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाही 230 धावांवर ऑलआऊट झाली. एकेकाळी टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, मात्र तळाच्या फलंदाजांनी हारकिरी केल्यानं भारताला सामना गमवावा लागला. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होईल असं सर्वांना वाटत होतं, पण तसं झालं नाही.
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती. यानंतर मोठा प्रश्न असा आहे की या सामन्यात पंच आयसीसीचा नवा नियम विसरले होते का? आयसीसी नियमांच्या कलम 16.3 नुसार, सामन्याचे दोन्ही डाव संपल्यानंतर धावसंख्या समान राहिल्यास सुपर ओव्हर खेळली जाईल. यानंतर आता बातम्या येत आहेत की, जर दोन्ही संघांमधील तिसरा वनडे सामनाही बरोबरीत सुटला, तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.
याप्रकरणी श्रीलंका क्रिकेटच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, पहिल्या सामन्यात सुपर ओव्हर करण्याचा नियम होता. आयसीसीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जर सामना पुन्हा टाय झाला, तर यावेळी सुपर ओव्हर घेण्यात येईल.
विशेष म्हणजे, भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामनाही टाय झाला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आला. मात्र जेव्हा पहिला एकदिवसीय सामना टाय झाला, तेव्हा पंचांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लागू झालेल्या नव्या आयसीसी नियमाचा विसर पडला. त्यामुळेच सुपर ओव्हर घेण्यात आला नाही.
हेही वाचा –
फिरकीपटूंपुढे लोटांगण, 27 वर्षांपासूनची विजयी मालिका थांबली; श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर अनेक विक्रम मोडले
यामुळे झाला पराभव, भारताच्या श्रीलंकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवामागची 3 प्रमुख कारणं
IND vs SL निर्णायक सामन्यात भारताचा पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी शानदार विजय