---Advertisement---

वर्ल्डकपच्या निमित्ताने देशांतर्गत फुटबॉल मार्केटमध्ये पुन्हा तेजी येणार? वाचा सविस्तर

On: बुधवार, जून 10, 2026 9:58 PM
---Advertisement---

क्रिकेटची देशातली लोकप्रियता अनन्यसाधारण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट पाहिलं जातं. व्ह्यूअरशिपच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर फुटबॉलचा नंबर आहे. केपीएमजीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मांडलेल्या अहवालानुसार भारतात ३०० मिलिअन फुटबॉल प्रेक्षक आहेत. क्रिकेटच्या व्ह्यूअरशिप आकड्याच्या निम्म्यापेक्षा थोडाच कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आकडेवारीचा विचार केला तर हा आकडा कमी आहे. मात्र तरीही २०१८ ते २०१५ या कालावधीत देशांतर्गत फुटबॉलची लोकप्रियता २५ टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात क्रिकेटची लोकप्रियता ३८ टक्क्यांनी वाढली आहे. लीगचा विचार केला तर बाकी खेळांच्या तुलनेत फुटबॉलच्या लीग खूपच मागे आहेत. इंडियन सुपर लीग ही स्पर्धा दिमाखात सुरू झाली. मात्र तिला अपेक्षित लोकाश्रय मिळू शकला नाही. इंडियन प्रीमिअर लीग, वूमन्स प्रीमिअर लीग आणि प्रो कबड्डी लीग या यशस्वी लीगच्या तुलनेत आयएसएल कुठेच दिसली नाही.

फुटबॉलच्या व्ह्यूअरशिपचे आकडे घटते असल्याने आणि डोमेस्टिक लीगचं बेतास बेत अस्तित्व यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यास फारसं कुणी उत्सुक नसतं. झी एंटरटेनमेंटने फिफाच्या स्पर्धांसाठीचे प्रक्षेपण हक्क मिळवले. २०३४ पर्यंतच्या स्पर्धांसाठीचे हक्क ३० मिलिअन डॉलर्स एवढी मोठी रक्कम खर्च करून झी ने पटकावले आहेत. मूळ स्पर्धेच्या तुलनेत आता जीव छोटा करण्यात आलेल्या आयएसएल स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क फक्त ९ कोटींनी विकण्यात आले होते. यंदाचा आयएसएलचा हंगाम प्रदीर्घ विलंबाने सुरू झाला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड यांच्यात बेबनाव झाल्याचा याला फटका बसला. देशातली फुटबॉल आवडणारी जनता प्रामुख्याने केरळ, गोवा आणि पश्चिम बंगाल इथे आहे.

फुटबॉल वर्ल्डकपचे सामने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार आहेत. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने रात्रीच असणार आहेत. यामुळेच स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क विकत घेण्यासाठी वाहिन्या उत्सुक नव्हत्या. दरम्यान झी समूहाने नवी क्रीडा वाहिनी सुरू केली आहे. Unite8 असं या वाहिनीचं नाव आहे. आवाका लक्षात घेऊन त्यांनी झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मचं बॅकएन्ड मजबूत केलं आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने देशातली फुटबॉल पाहणाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास झी समूहाला आहे. म्हणूनच त्यांनी अशी गुंतवणूक केली आहे.

क्रिकेटवेड्या देशात फुटबॉल ही नव्याने उदय होऊ पाहणारी बाजारपेठ आहे. २०२४-२५ उदयोन्मुख खेळांच्या मार्केटमध्ये २०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. जिओहॉटस्टार चॅनलच्या एकूण व्ह्यूअरशिपमध्ये फुटबॉलचा वाटा अवघा १ टक्के एवढा आहे. ओटीटीवर हे प्रमाण १.१ एवढं आहे. आयएसएल सुरू होण्यास विलंब होऊनही या आकडेवारीत घट झालेली नाही. डोमेस्टिक लीगचं नूतनीकरण होणं आवश्यक आहे.

लीगला संजीवनी देण्याव्यतिरिक्त अन्य काही बदल करता येतील. फिफाने मंजुरी दिलेल्या फुटबॉलची भारतात निर्मिती होते. जागतिक पातळीवर टॉप३ फुटबॉल निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. फुटबॉल गिअर आणि अपॅरल यामध्येही मोठी संधी आहे. अखिल भारतीय फु़टबॉल संघटना आयएसएलच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. परदेशस्थ ज्या खेळाडूंकडे ‘ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया’ कार्ड आहे त्यांना या लीगमध्ये संधी देता येईल का याची चाचपणी केली जात आहे. ‘टेलिग्राफ’ वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---