---Advertisement---

PBKS vs DC: पंजाब-दिल्ली सामना पुन्हा खेळवला जाणार का? पाहा नवी अपडेट!

On: शुक्रवार, मे 9, 2025 6:20 PM
---Advertisement---

काल (8 मे) रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे, हा सामना 10.1 षटकांनंतर थांबवण्यात आला. परंतु अजूनही हा सामना पुन्हा खेळवला जाईल की नाही? याबाबत चर्चा सुरू आहेत. कारण या सामन्याच्या लाईव्ह कॉमेंट्री दरम्यानही, समालोचकाने याबद्दल अपडेट दिले नव्हते. तोपर्यंत बोर्डाने या सामन्याबाबत कोणताही निर्णय दिला नव्हता. यादरम्यान आता पंजाब आणि दिल्ली सामन्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

(8 मे) रोजी पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात, कोणताही संघ जिंकला नाही किंवा कोणताही संघ हरला नाही. बीसीसीआयने अद्याप दिल्ली आणि पंजाबमधील सामन्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर, या सामन्यात दोन्ही संघांना कोणतेही गुण देण्यात आलेले नाहीत किंवा हा सामना दोन्ही संघांच्या खात्यात जोडण्यात आलेला नाही, ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा सामना (DC vs PBKS) यांच्यात पुन्हा खेळवला जाईल. परंतु बीसीसीआयकडून या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हा सामना रद्द झाल्यामुळे आयपीएल गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. पंजाब संघ 15 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स 13 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. बीसीसीआयने पंजाब-दिल्ली सामना रद्द करण्यासोबतच आयपीएलचा चालू हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---