विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागेवर दुसऱ्या कोणत्याही खेळाडू जागा घेतली, तरी त्याची कमी भरून काढू शकणार नाही. पण सध्या इंग्लंडचा माजी दिग्गज मोंटी पानेसरने (Monty Panesar) त्या खेळाडू बद्दल भाष्य केले आहे, जो कोहलीची जागा घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच त्याच्यामध्ये ती सिद्धता आहे. या दिग्गजाच मानणं आहे की, साई सुदर्शन (Sai surdarshan) भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार ठरू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता, ते गुण आहेत जे विराट कोहलीच्या विरासतला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात.
इंटरव्यूमध्ये जेव्हा पानेसरला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, कोणता खेळाडू विराट कोहलीची जागा घेऊ शकतो? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, हो संघात असे प्रतिभाशाली युवा खेळाडू आहेत आणि खास करून एक असा फलंदाज आहे, साई सुदर्शन. जो खूप शानदार पद्धतीने खेळतो. तो एक आक्रमक धाडसी आणि इंग्लंड विरुद्ध आव्हानात्मक परिस्थितीत चांगली खेळी करू शकतो.
माजी इंग्लंड फिरकीपटूने म्हटले माझं म्हणणं आहे की, तो भारतीय क्रिकेटचा पुढचा एक चमचमता तारा बनण्याची क्षमता ठेवतो. सुदर्शनने 29 प्रथम श्रेणी सामन्यात 1957 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2024-25 रणजी ट्रॉफी हंगामादरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली विरुद्ध त्याने एक द्विशतक सुद्धा झळकावलं होतं.