आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिला टी२० सामना ७ गडी राखुन जिंकताच मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे. तर या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र गेल्या मालिकेत आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघात स्थान न मिळाल्या अर्शदीप सिंगला या सामन्यात तरी संधी मिळेल की नाही ही नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.
आधी दक्षिण आफ्रिका आणि आता आयर्लंड विरुद्धच्या मालिका ह्या युवा खेळाडुंसाठी वरिष्ठ खेळाडुंच्या अनुपस्थितीत आपले कौशल्य दाखवत विश्वचषकासाठी आपली उमेदवारी सादर करण्याची सुवर्णसंधी होती. काही खेळाडुंनी या संधीचे सोने केले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये सतत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि या आयपीएल २०२२ पासुन ‘यॉर्कर किंग’ म्हणुन नवीन ओळख मिळालेल्या अर्शदीप सिंगला जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका तर आता आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुद्धा त्याला तंबूतच बसुन रहावे लागले. म्हणुन त्याला आयर्लंड दौऱ्यावरील शेवटच्या सामन्यात ही तंबूमध्येच बसावे लागेल की त्याला पदार्पणाची संधी मिळेल हे पाहणे गरजेचे असेल.
पंजाब किंग्ज संघाने रिटेन केलेल्या २ खेळाडूंपैकी एक नाव होते अनकॅप्ड (भारताच्या राष्ट्रीय संघाकडून न खेळणारे) खेळाडू अर्शदीप सिंगचे. अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ज संघाचा हा विश्वास खरा ठरवत त्याने या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यात केवळ ७.७०च्या इकोनॉमी रेटने १० बळी मिळवले. त्याने पंजाबसाठी केवळ अवघड षटकेच नाही टाकली तर त्याने मोक्याच्या क्षणी सामना बदलवण्याची किमया केली. जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याला देखील त्याने अखेरच्या षटकांमध्ये शांत ठेवले. तसेच तो अनेकवेळा चालु सामन्यात जगभरात आपल्या गोलंदाजीने दरारा निर्माण केलेल्या कागिसो रबाडाला देखील काही वेळा गोलंदाजीचा सल्ला देताना दिसून आला होता.
आयर्लंड विरुद्ध भारत (IREvsIND) दुसरा टी२० सामना मंगळवारी (२८ जून) खेेळला जाणार आहे. हा सामना द विलेज, मालाहिदे, डबलिन येथे खेळला जाणार आहे. पहिला सामनाही येथेच खेळला गेला होता. हा सामना जिंकत २-० अशी मालिका जिंकण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे यजमान संघ दुसरा टी२० सामन्यात विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या अनुपस्थितीत कोणीही असेल कर्णधार, पण विराट नाही; बालपणीच्या प्रशिक्षकाचेच वक्तव्य
IREvsIND: ऋतुराज दुखापतग्रस्त असताना पुण्याच्या भिडूला मिळू शकते संधी