---Advertisement---

2027 च्या वर्ल्ड कपमध्ये विराट-रोहितची गरज? माजी क्रिकेटपटूने दिले सडेतोड उत्तर!

On: शनिवार, जून 13, 2026 3:51 PM
---Advertisement---

2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचे (Team india) लक्ष वनडे वर्ल्ड कप जिंकण्याकडे आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपासूनच 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. पुढील वर्ल्ड कपपर्यंत रोहित 40 वर्षांचा आणि विराट 39 वर्षांचा असेल, त्यामुळे ते खेळणार की नाही, यावर चर्चा सुरू आहेत. आता या प्रश्नांचे उत्तर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने दिले आहे.

‘जिओस्टार’वर बोलताना इरफान पठाण म्हणाला की, (Irfan Pathan on Rohit & Virat) 2027 चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. तिथे रोहित शर्माचा ‘शॉर्ट-पिच’ (डोक्यावरून येणारे चेंडू) खेळण्याचा अनुभव खूप कामाला येईल. तो म्हणाला, रोहितची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो शॉर्ट-पिच चेंडू उत्तम प्रकारे हाताळतो. त्याचे टायमिंग जबरदस्त आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर चेंडूला जास्त उसळी आणि स्विंग मिळतो, अशा वेळी रोहितसारखा खेळाडूच त्या चेंडूंना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

इरफानने विराटच्या वनडे रेकॉर्डबद्दल आणि सामना जिंकून देण्याच्या क्षमतेबद्दलही सांगितले. जर भारताला पुढील वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर त्यांना विराट-रोहितची गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, विराट कोहलीकडे मधल्या फळीत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. वनडेमध्ये त्याच्यासारखा दुसरा खेळाडू नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाचा त्याचा रेकॉर्ड सर्व काही सांगून जातो.

पठाण पुढे म्हणाला, जर सुरुवातीच्या काळात भारताचे काही गडी बाद झाले, तर विराट कोहली येऊन डाव सावरू शकतो. त्याला मोठी खेळी करायला आवडते आणि लक्ष्याचा पाठलाग (चेजिंग) करण्याच्या बाबतीत तो जगात सर्वोत्तम आहे. जर भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर त्यांना रोहित आणि विराटच्या या गुणांची निश्चितच गरज भासेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---