विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2022 मध्ये विराटने त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉंटिंग याची बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या या दोघांच्या नावापुढे 71 शतकांची नोंद आहे. पॉंटिंगच्या मते विराट जगातलील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक करणारा फलंदाज देखील ठरू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा फलंदाज भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिनच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याच्या मते विराट कोहली (Virat Kohli) याची धावा करण्यासाठीची भूक पाहता तो भविष्यात सचिनचा हा विक्रम देखील तोडू शकतो. पॉंटिंगने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 560 सामन्यांमध्ये 71 शतक केले असून विराटला 71 शतक करण्यासाठी 468 सामने खेळावे लागले. सर्वाधिक शतक करणाऱ्यांच्या यादीत विराट सध्या दुसऱ्या तर पॉंटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट आणि सचिनमधील स्पर्धेविषयी बोलताना पॉंटिंग म्हणाला की, “हे पाहा मी असे म्हणूच शकत नाही की, त्याला (विराटला) हे जणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे तो एकदा लयीत आल्यानंतर धावा करण्यासाठी किती भुकेला असतो. यश मिळवण्यासाठी तो किती वचनबद्द आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, तो असे करू शकरणार नाही.”
दरम्यान, अशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने त्याचे 71 वे शतक केले. हे शतक करण्यासाठी त्याला तब्बल 1020 दिवसांची वाट पाहावी लागली. यादरम्यानच्या काळात तो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा देखील उतरला नव्हता. नोव्हेंबर 2019 नंतर त्याचे हे पहिलेच शतक असल्यामुळे याचे महत्व चाहते आणि विराटला स्वतःला देखील चांगल्या प्रकारे माहीत होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडने टी20 वर्ल्डकपसाठी जाहीर केला संघ, केंद्रीय करार धुडकावून लावणाऱ्या खेळाडूंचाही समावेश
विराट आता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही नडणार! टी-20 मालिकेत गोलंदाजी करण्याची शक्यता
‘टीम इंडियात व्यक्तिपूजा नसावी’! थेट धोनी-विराटचे नाव घेऊन गंभीरचे वादग्रस्त विधान