---Advertisement---

न्यूझीलंडने टी20 वर्ल्डकपसाठी जाहीर केला संघ, केंद्रीय करार धुडकावून लावणाऱ्या खेळाडूंचाही समावेश

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 9:41 AM
New Zealand Cricket Team
---Advertisement---

ऑक्टोबर 16 पासून ऑस्ट्रेलियामध्ये पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले असून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने मंगळवारी (20 सप्टेंबर) 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. केन विलियमसन नेतृत्व करणाऱ्या या संघामध्ये 2021विश्वचषकाच्या तुलनेत तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर नुकतेच न्यूझीलंडचा केंद्रीय करारात सहभागी होण्यास नकार दिलेल्या दोन खेळाडूंनाही संघात जागा दिली आहे.

केन विलियमसन (Kane Williamson) आयसीसी टी20 विश्वचषकात तिसऱ्यांदा न्यूझीलंडचे कर्णधारपद भुषविणार आहे. तसेच संघात कायले जेमीसन, टॉड एस्टल आणि टिम सेफर्ट यांच्याजागी लॉकी फर्ग्यूसन, माइकल ब्रेसवेल आणि फिन ऍलेन यांचा प्रवेश झाला आहे.

न्यूझीलंडच्या गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याच्यासोबत लॉकी फर्ग्यूसन, टिम साउदी आणि ऍडम मिल्ने यांचा समावेश आहे. तर इश सोढी फिरकीपटूंचे नेतृत्व करणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत ब्रेसवेल आणि मिशेल सँटनर यांची त्याला साथ लाभणार आहे. ब्रेसवेलने याचवर्षी न्यूझीलंडसाठी पदार्पण केले आहे. त्याने फलंदाजीत चमकदार कामगिरी करत संघातील जागा कायम केली आहे. यामुळेच त्याला विश्वचषकासाठी संघात घेतले आहे.

सलामीवीर मार्टिन गप्टिल याला संघात घेतले असून त्याचा हा सातवा टी20 विश्वचषक असणार आहे. जिमी नीशाम (Jimmy Neesham) न्यूझीलंड संघात बोल्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोमची कमी पूर्ण शकला असता. बोल्टने त्याच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील टी20 लीग खेळण्यासाठी यावर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय करारातून आपले नाव मागे घेतले होते. तर डी ग्रँडहोमने ऍडलेड स्ट्राईकर्सद्वारे बिग बॅश लीगसाठी ड्राफ्टमध्ये निवडले गेल्यानंतर त्वरित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

हे दोन खेळाडू संघातून गेल्यानंतर नीशमकडून त्यांची कमतरता पूर्ण करण्याची अपेक्षा होती. परंतु प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यानंतर त्याने लगेचच विभिन्न टी20 स्पर्धांमध्ये करार केला, ज्यामुळे त्याने केंद्रिय करार नाकारला आहे. आता बोल्ट आणि नीशाम या दोघांनाही टी20 विश्वचषकासाठीच्या संघात जागा दिली आहे.

 

टी20 विश्वचषक 2022साठी न्यूझीलंडचा संघ-
केन विलियमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, इश सोढी, मिशेल सँटनर, ग्लेन फिलीप्स, डॅरेल मिशेल, जिमी नीशाम, ऍडम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लोकी फर्ग्युसन, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट आता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही नडणार! टी-20 मालिकेत गोलंदाजी करण्याची शक्यता
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी
श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! विश्वचषकाच्या तोंडावर दिग्गजाला दिला नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---