भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 4 आॅक्टोबर पासून राजकोट येथे पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यांना भारतीय भुमीत 24 वर्षापासूनचा विक्रम मोडण्याची संधी आली आहे.
भारतीय संघाची बाजू मजूबत असून विराट कोहली संघात परतल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.
एक काळ असा होता की वेस्ट इंडिजचा संघ जगातील सर्व भागात सामने जिंकत होता. त्यामुळे त्यांची धाक साऱ्या संघांना पडायचा. नव्वदीच्या दशकानंतर मात्र या संघाला उतरती कळा लागली. आता सध्यस्थितीत ह्या संंघाची तुलना बांगलादेश आणि झिम्बाॅब्वेच्या संघासोबत व्हायला लागली आहे.
त्याच्याच परिणाम स्वरूप या संघाने 24 वर्षापासून भारतीय भुमीत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यांनी शेवटचा सामना डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडली होती. त्या संघामध्ये ब्रायन लारा, कार्टुनी वाल्श,कार्ल हूपर, जिमी अॅडम्स, केन्नी बेंजामीन हे महान खेळाडू होते.
या संघाने त्यानंतर भारतात 8 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला तर 2 सामने त्यांना अनिर्णित राहीले आहेत.
वेस्ट इडिंज शिवाय न्युझीलंडने 1988 पासून एकही कसोटी सामना भारतीय भुमीत जिंकलेला नाही. श्रीलंका संघाने आपला पहिला कसोटी सामना 1982 मध्ये खेळलेला आहे. अजूनही या संघाला भारतात कसोटी सामना जिंकण्यात यश आलेले नाही.
जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाला भारतीय संघाचे भारतीय भूमावरील मक्तेदार मोडण्याचे आव्हान असणार आहे
महत्वाच्या बातम्या-
–आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका
-हा महान कसोटीपटू म्हणतो, ‘स्टीव वाॅ’सारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही
-माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग