महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुरुगझाने माग्दालेना रायबारीकोवावर ६-१, ६-१ अशी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ३ वर्षातील हा तिचा दुसरा अंतिम सामना आहे.
केवळ ६४ मिनिटात आपल्या समोरच्याचे आव्हान मोडीत काढत मुरगझाने आपली तयारी दाखवून दिली आहे. तिचा अंतिम सामना व्हिनस विल्यम्स आणि जोहाना काँटा यांच्यातल्या विजेतीशी होणार आहे. २०१५ साली सेरेना विल्यम्स कडून हार पत्करावी लागली होती. १४ मानांकित मुरुगझा आता अंतिम सामन्यात काय वेगळं करते हे पहायला नक्कीच मजा येईल.