---Advertisement---

इंग्लंडच्या चाहत्यांसमोर विंबल्डन आणि फूटबाॅल फायनल पाहण्याचा यक्ष प्रश्न

On: सोमवार, जुलै 9, 2018 6:24 PM
---Advertisement---

रशियात 14 जूनला सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे.

तर 2 जुलैला सुरु झालेल्या 2018 च्या विंम्बडन स्पर्धाच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामनाही 15 जुलैला होणार आहे.

विंम्बलडनच्या पुरूष एकेरीचा सामना 15 जुलै रोजी स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. तर फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना दुपारी 4 वाजता सुरु होणार आहे. त्यात टेनिसचा सामना नक्की किती वेळ चालेल याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे या दोन खेळात प्रेक्षक विभागण्याची शक्यता आहे.

फुटबॉल आणि टेनिसला इंग्लंडसहीत साऱ्या जगभरात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग लाभला आहे.

तसेच इंग्लंडचा फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. इंग्लंच्या अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले काही दिवस विंम्बलडन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्याची वेळ बदलण्याच्या चर्चा सुरु होत्या.

मात्र आज सोमवारी (9 जुलै) ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे अध्यक्ष रीचर्ड लेविस यांनी विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याच्या वेळेत कोणाताही बदल होणार नाही असे सांंगितले आहे.

“आम्हाला इंग्लंडच्या फिफा विश्वचषकातील यशाची उत्सुकता आहे. देशात ऐक्य भावना वाढण्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.उपांत्य पूर्व सामन्यात इंग्लंडने स्वी़डनचा पराभव केल्यानंतर इथे आम्ही खूप जल्लोष केला होता.” असे ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे अध्यक्ष रीचर्ड लेविस म्हाणाले.

“कित्येक वर्षांपासून विंम्बलडनचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता सुरु होत आहे. ती विंम्बलडनची परंपरा आहे. त्यामुळे या सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा प्रश्नच नाही.” ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे अध्यक्ष रीचर्ड लेविस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-एकवेळ चालवत होता पाणीपुरीचा गाडा आता थेट भेटला मास्टर ब्लास्टर सचिन…

-रोहीतच्या नावावर असाही एक पराक्रम ज्याचा विचार काही खेळाडू फक्त करु…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment