---Advertisement---

इतिहासातील सर्वात महागडा अंतिम सामना…12 लाखाचं एक तिकीट! सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत जाणून बसेल धक्का

On: रविवार, जुलै 14, 2024 5:23 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा असलेल्या विम्बल्डन ओपनचा अंतिम सामना ऐतिहासिक ठरणार आहे. रविवारी (14 जुलै) जागतिक टेनिस क्रमवारीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ हे विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने आहेत. मात्र या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल! हे तिकिट घेणं सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्यच आहे.

नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ यांच्यातील विम्बल्डनच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत सुमारे 5.8 लाख रुपयांपासून सुरू होते. अमेरिकन चलनात सर्वाधिक तिकिटाची किंमत 10 हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तिकिटांची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाइट्सवर किंमती बदलू शकतात. अंतिम सामन्याच्या सर्वात महाग तिकीटाची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे इतिहासातील कोणत्याही टेनिस स्पर्धेतील हा सर्वात महागडा सामना ठरणार आहे. कारण इतकी महागडी तिकिटं यापूर्वी कधीही विकली गेली नव्हती.

विशेष म्हणजे, जोकोविच आणि अल्कारेझ 2023 विम्बल्डनच्या फायनलमध्येही आमनेसामने आले होते. गेल्या वेळी 21 वर्षीय अल्कारेझननं 5 सेटच्या मॅराथॉन लढतीत जोकोविचचा 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा पराभव करून पहिल्यांदाच विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं. आता हे दोन खेळाडू पुन्हा एकदा जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. एकीकडे जोकोविचला कारकिर्दीतील विक्रमी 25वं ग्रँडस्लॅम आणि एकूण आठवं विम्बल्डन विजेतेपद जिंकायचं आहे. तर दुसरीकडे कार्लोस अल्कारेझचं हे या वर्षातील दुसरं आणि कारकिर्दीतील चौथं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरू शकतं.

नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ 2022 च्या माद्रिद एटीपी स्पर्धेत पहिल्यांदा आमनेसामने आले होते. या सामन्यात अल्कारेझनं बाजी मारली होती. त्यानंतर हे दोन खेळाडू आणखी 5 वेळा आमनेसामने आले. आजपर्यंत जोकोविच आणि अल्कारेझ यांच्यातील 6 सामन्यांपैकी दोघांनी 3-3 वेळा विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बार्बोरा क्रेजिकोव्हा बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन….इटलीची खेळाडू इतिहास रचण्यापासून चुकली
नाईलाजास्तव खेळायला सुरुवात केली…आज बनला जगातील सर्वात प्रसिद्ध भालाफेकपटू! मजेदार आहे नीरज चोप्राची कहानी
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---