---Advertisement---

नोवाक जोकोविच विम्बल्डन जिंकल्यावर गवत का खातो? जाणून घ्या कारण

On: सोमवार, जुलै 11, 2022 7:11 PM
Novak Djokovic
---Advertisement---

लंडन। काही खेळाडू त्यांच्या विजयाचा आनंद शॅम्पेन पिऊन साजरा करतात. तर दुसरीकडे नोवाक जोकोविच गवत खाऊन त्याचा आनंद साजरा करतो. रविवारी (१० जुलै) विम्बल्डन २०२२ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यानंतरही त्याने नेहमीच्या पद्धतीने या विजेतेपदाचा आनंद साजरा केला आहे.

विंबल्डन २०११च्या स्पर्धेत जोकोविचने स्पेनच्या राफेल नदाल (Rafael Nadal) याला हरवून पहिलेच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले होते. तेव्हापासून त्याने त्याची गवत खाण्याची प्रथा सुरू केली. त्याने या प्रथेच्या मागचे कारण स्पष्ट केले होते.

“जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून माझे विम्बल्डनमध्ये खेळण्याचे स्वप्न होते. आपले एखादे स्वप्न पूर्ण झाले तर आपल्याला खूप आनंद होतो. माझेही स्वप्न पूर्ण झाल्याने मला विशेष आनंद झाला आहे,” असे जोकोविचने सांगितले आहे.

या सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस (Nick Kyrgios) याचा पराभव करत कारकिर्दीतील २१ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या शर्यतीत जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. फेडररने आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या यादीत स्पेनचा राफेल नदाल २२ ग्रँडस्लॅमसह अव्वल स्थानावर आहे.

https://twitter.com/Wimbledon/status/1546166781173288961?s=20&t=qFZGZtJS29vA3fvRkWMA1w

जोकोविचचे हे एकूण ७वे विम्बल्डन विजेतेपद ठरले आहे. त्यामुळे त्याने विलीयम रेनशॉं(७) आणि पीट सँप्रास (७) यांची बरोबरी केली आहे. सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपदं जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडरर(८) अव्वल स्थानावर आहे. जोकोविचने २०११, २०१४, २०१५,२०१८,२०१९, २०२१ आणि २०२२ या सात वर्षी विम्बल्डन विजेतीपदं जिंकली आहेत.

जोकोविच, फेडरर आणि नदाल या तिघांच्या नावावर वर्षाच्या सुरूवातीला २०-२० ग्रँडस्लॅम होती. नदालने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेचं ओपन जिंकत आघाडी घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्या बात है! उमेश यादव आता ‘या’ संघाकडून दिसणार खेळताना, व्हिसाही मंजूर

कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डनमध्ये! देशातून होतोय कौतुकांचा वर्षाव, एकदा कामगिरी पाहाच

सूर्यकुमार यादवने दाखवली कमाल, भारताचा माजी दिग्गज म्हणाला हा तर ‘मिस्टर 360 डिग्री’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---