एटींग्वा। विंडीज विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (2 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. यामध्ये विंडीज 100 धावांनी आघाडीवर आहे.
यावेळी विंडीजचा गोलंदाज अल्झारी जोसेफला मातृशोक झाला आहे. त्याची आई शेरॉन जोसेफ यांचे आज निधन झाले आहे. यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधत शोक व्यक्त केला आहे.
अल्झारी सध्या संघामध्येच असून सध्या त्याचे घरी परतण्याबाबतचे कोणतेही वृत्त हातात आले नाही. त्याचबरोबर तो अजून या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला नाही. या संकटसमयी विंडीजचे दिग्गज क्रिकटपटू इयान बिशप यांनीही त्याचे सांत्वन केले आहे.
22 वर्षीय अल्झारीने या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर जोइ डेनलीला बाद केले आहे. तर त्याने 10 षटकात 38 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत.
या मालिकेत अल्झारीने 5 विकेट्स घेतल्या आहे. विंडीजचा संघ 3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. त्यांनी पहिला सामना 381 धावांनी जिंकला होता.
https://twitter.com/windiescricket/status/1091682991523446784
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
–या वेगवान गोलंदाजांनी केली आहे रोहित शर्माची सर्वाधिक वेळा शिकार
–न्यूझीलंडचा द्विशतकवीर पाचव्या वन-डेला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण






