ख्राईस्टचर्च| रविवारी (३ एप्रिल) महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात हॅगली ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ७१ धावांनी विजय मिळत ऑस्ट्रेलिया महिला संघाने विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले. महिला विश्वचषक जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची ही सातवी वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाचा सातव्यांदा विश्वविजय
ऑस्ट्रेलिया महिला संघाने (Australia Women Team) रविवारी इंग्लंडला पराभूत (Australia vs England) करत विश्वचषकावर सातव्यांदा आपले नाव कोरले असून मोठा विश्वविक्रमही केला आहे. आजपर्यंत सातवेळा यापूर्वी कोणत्याच संघाला विश्वविजेतेपद जिंकता आले नव्हते. विशेष म्हणजे आत्तापर्यंत १२ वेळा महिला विश्वचषक खेळवण्यात आला आहे. यातील सातवेळा तर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३ आणि २०२२ या वर्षी महिला विश्वचषकावर नाव कोरले आहे.
Stuff of dreams ✨
A seventh ICC Women's Cricket World Cup title for Australia 🏆#CWC22 pic.twitter.com/dN2s9Xh5Y2
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) April 3, 2022
ऑस्ट्रेलियानंतर सर्वाधिकवेळा इंग्लंड महिला संघाने (England Women Team) महिला विश्वचषक (Women’s World Cup) आपल्या नावावर केला आहे. इंग्लंड महिला संघाने १९७३, १९९३, २००९ आणि २०१७ या चार वर्षी विश्वचषक जिंकला. या यादीत न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने २००० साली आपल्याच मायदेशात विश्वचषक जिंकला आहे. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तीन संघांनाच महिला विश्वचषक जिंकता आलेला आहे.
भारतीय महिला संघाबद्दल सांगायचे झाले तर २००५ आणि २०१७ साली भारताने मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. पण दोन्ही वेळा भारताला अपयशाचा सामना करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २०२२ महिला विश्वचषकातही मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळला. पण, या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतही स्थान मिळवू शकला नाही.
महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आजपर्यंतचे विजेते (Winners and runners up of the ICC Women’s World Cup)
१९७३ विश्वचषक – ठिकाण – इंग्लंड
विजेते – इंग्लंड संघ, उपविजेते – ऑस्ट्रेलिया
१९७८ विश्वचषक – ठिकाण – भारत
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – इंग्लंड
१९८२ विश्वचषक – ठिकाण – न्यूझीलंड
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – इंग्लंड
१९८८ विश्वचषक – ठिकाण – ऑस्ट्रेलिया
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – इंग्लंड
१९९३ विश्वचषक -ठिकाण – इंग्लंड
विजेते – इंग्लंड संघ, उपविजेते – न्यूझीलंड
१९९७ विश्वचषक -ठिकाण – भारत
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – न्यूझीलंड
२००० विश्वचषक -ठिकाण – न्यूझीलंड
विजेते – न्यूझीलंड संघ, उपविजेते – ऑस्ट्रेलिया
२००५ विश्वचषक -ठिकाण – दक्षिण आफ्रिका
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – भारत
२००९ विश्वचषक -ठिकाण – ऑस्ट्रेलिया
विजेते – इंग्लंड संघ, उपविजेते – न्यूझीलंड
२०१३ विश्वचषक -ठिकाण – भारत
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – वेस्ट इंडिज
२०१७ विश्वचषक -ठिकाण – इंग्लंड
विजेते – इंग्लंड संघ, उपविजेते – भारत
२०२२ विश्वचषक -ठिकाण – न्यूझीलंड
विजेते – ऑस्ट्रेलिया संघ, उपविजेते – इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेविरुद्ध धवनची बॅट आग ओकणार! ‘रनमशीन’ला मागे टाकत ‘बड्या’ विक्रमात सर्वांवर सरस ठरणार
अक्षर पटेलने परदेशी खेळाडूला शिकवला ‘बल्ब उतारो डान्स’, Video पाहून व्हाल लोटपोट
विश्वचषक फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह एलिसा हिलीने विक्रमांची घातली रास, केले नवे-जुने रेकॉर्ड नावे