इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शानदार झाली आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळत असल्यामुळे रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला असून या सामन्यात संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर संघाने दूसरा सामना २ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. पहिल्या सामन्यातील सलामिवीर टिम सीफर्ट (Team Seifert) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) इंस्टाग्राम आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये टिम सीफर्ट डोनर या चित्रपटातील ‘बल्ब उतारो’ डान्स स्टेप करताना दिसला आणि त्याला अक्षर पटेल डान्स शिकवताना दिसला. हा प्रकार गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाहायला मिळाला.
दिल्ली संघाने त्याचा व्हिडिओ शेअर करत व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘सीफर्टची बॅटरी चार्ज असते. दिल्लीमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण’. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दिल्ली संघ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नव्या सलामीवीर जोडीसह उतरला आहे. पहिल्या सामन्यात पृथ्वी शाॅसोबत टिम सीफर्टने डावाची सुरुवात केली होती. मात्र टिम सीफर्ट या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही, तो १४ चेंडूत २१ धावा करुन बाद झाला. त्याचा झेल कायरन पोलार्डने घेतला जो खुप चर्चेत राहिला. त्यानंतर आता त्याचा व्हिडीओ सुद्धा चर्चेत आहे.
https://www.instagram.com/p/Cb0EPB0vpUP/?utm_medium=copy_link
दिल्लीचा दूसरा सामना गुजरातविरुद्ध झाला, ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघातील खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. शुभमन गीलने ६ चौकारांच्या आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८४ धावा केल्या, तर हार्दिकने ३१ धावा केल्या. गुजरातने दिल्लीसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आव्हानाचा बचाव करताना लाॅकी फर्ग्युसनने २८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. दिल्ली संघ लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकातच १५७ धावांवरच सर्वबाद झाला आणि हा सामना गुजरातने १४ धावांनी जिंकला.
दिल्लीने पहिला सामना मुंबईविरुद्ध जिंकला असून दूसऱ्या सामन्यात संघाला अपयश आले आहे. आता संघ ७ एप्रिलला लखनऊ सुपरजांट्सविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे. तर गुजरातने दोनही सामने जिंकले आहेत. आता त्यांचा तिसरा सामना ८ एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आपली बॅटिंग भारी, आपली फिल्डिंग भारी! बटलरने हवेत झेपावत घेतलेला झेल ठरतोय चर्चेचा विषय
सीएसकेची डगमगती गाडी रूळावर येणार? हुकुमी गोलंदाज दीपक चाहरबाबत मोठी अपडेट पुढे
IPL 2022| केव्हा, कुठे आणि कसा पाहाल चेन्नई वि. पंजाब सामना, जाणून घ्या सर्वकाही






