सीएसकेची डगमगती गाडी रूळावर येणार? हुकुमी गोलंदाज दीपक चाहरबाबत मोठी अपडेट पुढे

सीएसकेची डगमगती गाडी रूळावर येणार? हुकुमी गोलंदाज दीपक चाहरबाबत मोठी अपडेट पुढे

इंडियन प्रीमियर लीगमध्ये ४ वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिल्या दोनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर सीएसके संघात वेगवान गोलंदाज दिपक चहरची कमी जाणवत आहे. आता चाहत्यांसाठी आनंदाची बाब समोर आली आहे की, चहरला बॅंगलोर येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून लवकरच सोडले जाणार आहे. 

भारताचा वेगवान गोलंदाज चहर हॅमस्ट्रिंगच्या दूखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार चहर बॅंगलोरमध्ये आहे आणि त्याला दोन आठवड्यांमध्ये एनसीएमधून रिलीज केले जाणार आहे. यानंतर असा दावा केला जात आहे की, हा सीएसकेचा खेळाडू २५ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात दीपक चहरला सीएसकेने १४ कोटींना विकत घेतले आहे. लिलावात त्याच्यावर सर्वाधिक बोली सनरायझर्स हैदराबादने लावली नंतर दिल्लीने लावली, परंतु सीएसकेने त्याच्यावर १० कोटींहून अधिक रुपये लावले. परंतु हा खेळाडू सीएसकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात खेळताना दिसला नाही.

दीपकला मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान दूखापत झाली होती, त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून सुद्धा बाहेर झाला होता. आता तो लवकरच आयपीएलसाठी मुंबईत दाखल होणार आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२२ मध्ये ४ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे. सीएसकेहून जास्तवेळा म्हणजेच पाचवेळा मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

सीएसके संघात गोलंदाज ऍडम मिल्ने आणि क्रिस जाॅर्डन सुद्धा पुर्णपणे तंदूरुस्त नाहीत. त्यामुळे लखनऊविरुद्धच्या सामन्यात मुकेश चौधरी आणि तुषार देशपांडेला सीएसकेकडून मैदानात उतरावे लागले. मिल्नेला २६ मार्चला केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यात दूखापत झाली होती आणि जाॅर्डनला टाॅन्सिल संक्रमणाच्या कारणाने सहा दिवसांसाठी मुंबईच्या दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संघाचे गोलंदाजी क्षेत्र पुर्णपणे कोलमडले आहे. मिल्ने ३ एप्रिलला पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेम करुया खुल्लम खुल्ला! IPLच्या मैदानावर पहिल्यांदाच एकमेकांना किसsss करताना जोडपे कॅमेरात कैद

ऑस्ट्रेलियाच्या पोरी सातव्यांदा विश्वविजेत्या! फायनलमध्ये इंग्लंडला ७१ धावांनी नमवले, हिली विश्वविजयाची शिल्पकार

थालासाठी खास सरप्राईज! २०११ विश्वचषक विजेतेपदाच्या ११ व्या वर्षपूर्तीनिमित्त धोनीचे सीएसकेबरोबर सेलिब्रेशन, पाहा Video

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.