---Advertisement---

IPL 2022| केव्हा, कुठे आणि कसा पाहाल चेन्नई वि. पंजाब सामना, जाणून घ्या सर्वकाही

On: रविवार, एप्रिल 3, 2022 1:59 PM
Mayank-Agarwal-and-Ravindra-Jadeja
---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज ब्रेबॉर्न स्टेडियमवर आमने सामने असणार आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत फलंदाजांना खूप धावा केल्याचे पाहायला मिळाले. मैदानात दव मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे गोलंदाजांना अडचण निर्माण होत आहे, जी दुसऱ्या डावात जास्तच वाढते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेत आहेत.

सीएसकेने आयपीएलच्या चालू हंगामातील त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. अशात सीएसके या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल, तर दुसरीकडे पंजाब किंग्जने खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे, तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. मागच्या सामन्यात केकेआरकडून ६ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर पंजाब विजयाच्या मार्गावर परतण्याच्या प्रयत्नता असेल.

ब्रेबॉर्नवर होतायत मोठ्या धावा
आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये दोन सामने खेळले गेले आणि या दोन्ही सामन्यांमध्ये संघांनी मोठी धावसंख्या उभारली. रात्रीच्या सामन्यात दवामुळे खूप परिणाम होत असल्याचे दिसले. या सामन्यातही चाहत्यांना फलंदाजांचे मोठ शॉट्स पाहायला मिळू शकतात.

संभावित प्लेइंग इलेवन

चेन्नई सुपर किंग्सची संभावित प्लेइंग इलेवन- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोइन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर.

पंजाब किंग्सची संभावित प्लेइंग इलेवन- मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, हरप्रीत बरार, ऋषि धवन, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर.

आयपीएल २०२२ मधील ११ व्या सामन्याबद्दल सर्वकाही…

१. आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना केव्हा होणार?
– हा सामना रविवारी म्हणजेच ३ मार्च रोजी खेळला जाणार आहे

२. आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना कुठे खेळला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल

३. आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना किती वाजता खेळला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल

४. आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना कुठे पाहायचा?
– आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहायला मिळेल.

५. आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना मोबाईलवर कसा पाहू शकतो?
– आयपीएल २०२२ मधील सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज सामना मोबाईलवर पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन आवश्यक असते.

महत्वाच्या बातम्या –

‘…तर जिंकलो असतो’, मुंबईच्या दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया; सूर्यकुमारबद्दलही दिले अपडेट्स

Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती

DC vs GT | शुबमनची शानदार खेळी अन् फर्ग्युसनचा भेदक मारा, गुजरातचा दिल्लीवर सोपा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---