अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने खास विक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 85 षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा घेतला. याबरोबरच या सामन्यातील त्याचे 10 झेलही पूर्ण केले आहेत.
त्यामुळे तो एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत वृद्धीमान साहासह अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. साहाने यष्टीरक्षक म्हणून याचवर्षी केपटाउन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच कसोटी सामन्यात 10 झेल घेण्याची कामगिरी केली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नयन मुंगीया आणि एमएस धोनी आहेत. यांनी एका कसोटी सामन्यात 8 झेल घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच मुंगीयाने अशी कामगिरी 1996 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे आणि 1999 ला कोलकतामध्ये पाकिस्तान विरुद्ध असे दोन वेळा केली आहे. तर धोनीने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 2014 मध्ये मेलबर्न कसोटीत 8 झेल घेतले होते.
तसेच पंत हा यष्टीरक्षक म्हणून एका कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारा जगातील 6 वा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी जॅक रसेल(11), एबी डेविलियर्स(11), बॉब टेलर(10), अॅडम गिलख्रिस्ट(10) आणि साहा(10) यांनी केली आहे.
याबरोबरच या 10 झेलांसह पंत हा यष्टीमागे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतही साहासह अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर यष्टीमागील 9 विकेटसह एमएस धोनी आहे. त्याने 2014च्या मेलबर्न कसोटीत 8 झेल आणि 1 यष्टीचीत केले होते.
पंतने या सामन्यात पहिल्या डावात 6 झेल घेतले होते. त्यामुळे त्याने कसोटी सामन्यातील एका डावात यष्टीरक्षक म्हणून 6 झेल घेण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
धोनीने 2009 ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 6 झेल घेण्याचा पराक्रम केला होता.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे भारतीय यष्टीरक्षक-
10* – रिषभ पंत (2018, अॅडलेड, आॅस्ट्रेलिया विरुद्ध)
10 – वृद्धिमान साहा (2018, केपटाउन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध)
8 – नयन मुंगीया (1996, डर्बन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध)
8 – नयन मुंगीया (1999, कोलकता, पाकिस्तान विरुद्ध)
8 – एमएस धोनी (2014, मेलबर्न, आॅस्ट्रेलिया विरुद्ध)
एका कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारे यष्टीरक्षक:
11 – जॅक रसेल, एबी डेविलियर्स
10 – बॉब टेलर, अॅडम गिलख्रिस्ट, वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत#म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) December 10, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत विजयासाठी भारताला ४ विकेट्सची गरज
–आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!